PM Kusum Solar Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Solar Pump : सोलर पंपाची रक्कम भरली ; पण पंप वाटपाचा पत्ताच नाही

Solar Pump Scheme : राज्य शासनाच्या वतीने ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेखाली अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन रक्कम भरून दीड ते दोन महिने उलटले आहेत.

Team Agrowon

Jalna News : राज्य शासनाच्या वतीने ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेखाली अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन रक्कम भरून दीड ते दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत सोलर पंपासाठी कंपनीची निवड करण्यासाठी चॉइस मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रात्री-बेरात्री शेतकऱ्यांची विजेच्या समस्येपासून सुटका व्हावी, यासाठी शेतकऱ्यांना सोलार पंप वापरण्यासाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून सोलार पंप मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पुरती भ्रमनिराशा होत चालली आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोलार पंप मिळविण्यासाठी अर्ज व पैसे भरले. मात्र सोलर पंप मिळविण्यासाठी कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत. शेतकऱ्याला सोलर पंप मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना आठ दिवस रात्री, तर आठ दिवस दिवसा वीज मिळते. मात्र, विजेची समस्या सतत जाणवत आहे. सतत वीज यंत्रणेत होणारे बिघाड, रोहित्रामधील बिघाड यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाला जगविण्यासाठी पिकांना पाणी देता येईना.

रात्रीच्या वेळेस पिके, फळबागांना पाणी देताना साप, विंचू-काटा आदींपासून धोके उद्‍भवतात. त्यातच विजेचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण होऊन बसले आहे. अशावेळी शेतकऱ्यांसाठी सोलार पंप वरदान ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT