PM Kisan News agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan News : नमो सन्मानबरोबर पीएम किसानचाही हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार का? पाहा अपडेट

PM Kisan : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ताही लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

sandeep Shirguppe

PM Kisan Scheme : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने काल(ता.१०) मंगळवारी मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणाऱ्या या योजनेतील २ हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहीत मंत्रीमंडळात देण्यात आली.

दरम्यान केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ताही लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पीएम किसानचा हफ्ता मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना फेब्रुवारी २०१९ पासून आर्थिक मदत केली जात आहे. यासह ८५ दशलक्ष (सुमारे ८.५ कोटी) कुटुंबांना आर्थिक मदत मिळते. कोरोना महामारीच्या काळात मोठ्या संख्येने कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला.

दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात 'नमो शेतकरी महासन्मान निधी' ही योजना घोषित केली होती.

केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्यास ६ हजार रुपये अनुदान मिळते. यात राज्याच्या आणखी ६ हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो महासन्मान निधी योजना राबविण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती.

याचबरोबर निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरु आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT