Sugar Export Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Export : साखरेच्या २० लाख टन निर्यातीस परवानगी द्या

Sugar Market : यंदा समाधानकारक साखर उत्पादन असल्याने इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इस्मा) ने केंद्राकडे २० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी मागितली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदा समाधानकारक साखर उत्पादन असल्याने इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इस्मा) ने केंद्राकडे २० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी मागितली आहे. अपेक्षेपेक्षा वाढलेले उत्पादन व हंगाम संपल्यानंतर शिल्लक राहिलेला साठा याची आकडेवारी देत ही मागणी केली आहे.

निर्यातीला परवानगी दिल्यास शेतकऱ्यांची शिल्लक देणी कारखान्यांना भागवता येणार असल्याचेही संघटनेने म्‍हटले आहे. यंदाचे साखर उत्पादन ३२० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. एप्रिल अखेरपर्यंत ३१४ लाख टन साखर उत्पादन झाले. अजून उत्तर प्रदेश व तमिळनाडूत हंगाम सुरू आहे. यामुळे अजूनही साखर उत्‍पादन वाढण्याची शक्‍यता आहे.

१ ऑक्टोबर २०२३ अखेर ५६ लाख टनांचा प्रारंभिक साठा होता. यंदाच्या हंगामासाठी २८५ लाख टनांचा अंदाजे घरगुती वापर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामाचा अंदाज घेता ९१ लाख टन इतका उच्च साठा शिल्लक राहू शकतो. पुढील हंगाम सुरू होताना किमान तीन महिन्यांचा स्टॉक (किमान ६० ते ७० लाख टन) शिल्‍लक ठेवावा लागतो. सध्याचा विचार केल्‍यास हा साठा जादा प्रमाणात शिल्लक राहील, अशी शक्यता आहे. जादा साखर शिल्लक राहिल्यास याचा दबाव कारखान्यांवर येऊ शकतो. शिल्लक साखरेमुळे साठविण्याचा खर्च अधिक प्रमाणात येऊ शकतो. याचा फटका कारखान्यांना बसण्याची शक्‍यता आहे.

यंदा साखर उत्पादन चांगले असल्याने साखरेची निर्यात होणे अतिशय गरजेचे आहे. साखरेला चांगली मागणी आहे. याचा फायदा साखर उद्योगाला होण्यासाठी आम्ही निर्यातीसाठी परवानगी मागितली आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचे अंदाज आदी कारणांमुळे पुढील हंगामात साखर उत्पादन वाढू शकेल.
दीपक बल्लानी, महासंचालक, इस्मा

जागतिक बाजारात साखरेला चांगली मागणी

सध्‍या जागतिक बाजारात साखरेला चांगली मागणी आहे. साखरेचा विनाकारण साठा शिल्लक ठेवण्यापेक्षा त्‍याची निर्यात झाल्यास कारखान्यांना दुहेरी फायदा होऊ शकतो. यामुळे एकतर साखरेचा उठाव होईल आणि चांगला दर मिळाल्‍याने कारखान्यांची आर्थिक स्‍थिती सुधारेल. याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांची देणी देण्यावर होईल. यामुळे कोणत्याही परिस्‍थितीत केंद्राने साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘इस्मा’ची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT