Kharip Crop Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : धाराशिवमध्ये पीककर्जाचे वाटप ३५ टक्क्यांवर

Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५८३ कोटी ७७ लाख पीककर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने पीककर्ज वाटपाचा टक्का वाढण्याची आशा आहे. दरम्यान १५ जूनपर्यंत जिल्ह्यासाठी निश्‍चित उद्दिष्टाच्या ३५ टक्क्यांचे कर्जवाटप झाले आहे. यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सर्वाधिक २२८ कोटींचे वाटप करून ८५ टक्के उद्दिष्ट साध्य केले असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्जाची आपली नवंजुनंची परंपरा कायम ठेवत ३९ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठले आहे. मोठे उद्दिष्ट असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र व भारतीय स्टेट बँकेचे वाटप वीस टक्केच आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५८३ कोटी ७७ लाख पीककर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. यातूनच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीककर्जाचे जास्त वाटप करण्यासाठी बँका सरसावल्या.

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी हंगामपूर्व बैठकीतून बँकांना त्यांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार पीककर्जाचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी गावागावांत शिबिराचे आयोजन करण्याचेही आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार बँकांनी कर्जवाटप करण्यास सुरुवात केली तरी १५ जूनपर्यंत ५५ हजार ५९२ शेतकऱ्यांना ६५९ कोटी ३५ लाखाचे कर्जवाटप झाले आहे.

यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३७ कोटी ८२ लाखाचे उद्दिष्ट असले, तरी बँकेने १३ हजार ३३५ शेतकऱ्यांकडील पीककर्जाचे नवंजुनं करून २८५ कोटी ३० लाखाचे वाटप करत ३९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचे दिसत आहे. जिल्हा बँक वगळता अन्य बँकांकडून शेतकऱ्यांना नवीन पीककर्जासह कर्जाच्या नूतनीकरणातून पेरणीसाठी हातात काही रक्कम येण्याची आशा असते. यातूनच राष्ट्रीयीकृत बँकांकडून जास्त कर्जाचे वाटप करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आघाडी घेत २३ हजार ५४७ शेतकऱ्यांना २२८ कोटी ४१ लाखाचे वाटप केले आहे. त्यानंतर ४१० कोटी ८९ लाख उद्दिष्ट असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आठ हजार ३०१ शेतकऱ्यांना ७३ कोटी ५३ लाख तर २५८ कोटी ८५ लाखाचे उद्दिष्ट असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने पाच हजार ६६२ शेतकऱ्यांना ४१ कोटी ४६ लाखाचे वाटप केले आहे.

उर्वरित बँकांना दीड ते ५० कोटीचे उद्दिष्ट असले, तरी आयडीबीआय बँकेचा अपवाद सोडला तर अन्य बँकांचे वाटप अजून वीस टक्क्यांच्या आतच आहे. आयडीएफसी फर्स्ट, कोटक महिंद्रा, डीसीबी व बंधन बँकेने अजून एक रुपयाचेही वाटप केले नाही.

यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पीककर्जाची मागणी शेतकऱ्यांकडून वाढणार आहे. आतापर्यंत झालेले वाटप हे गतवर्षी झालेल्या एकूण वाटपाएवढे आहे. बँकांनी १५ जूननंतरही मोठे कर्ज वाटप केले असून ३० जून रोजी घेण्यात येणाऱ्या आढाव्यात त्याची माहिती पुढे येईल. बँकांनी दत्तक गावात जाऊन शिबिर घेण्यासह शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे नूतनीकरण करावे व पात्र शेतकऱ्यांना नवीन कर्ज मंजूर करावे, आदी सूचना दिल्या आहेत. यंदा कर्ज वाटपाचा टक्का नक्कीच वाढेल.
- चिन्मय दास, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT