Onion Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Production : आळेफाटा शेतकऱ्यांचा कांदा बियाणे उत्पादनाकडे वाढता कल

Onion Cultivation : गतवर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता, त्यातच अवकाळी व अति पर्जन्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपांचे नुकसानन झाले होते.

Team Agrowon

Pune News : आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांचा कांदा बियाणे बनवण्याकडे कल वाढलेला दिसून येत आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे टाकलेले असून ते आता बीजोत्पादनासाठी लावलेले कांदे बी भरण्याच्या अवस्थेत असून हे शेत अतिशय मनमोहक दिसत आहे.

गतवर्षी कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता, त्यातच अवकाळी व अति पर्जन्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपांचे नुकसानन झाले होते. त्यामुळे कांदा बियाण्यांना सोन्याचा बाजार भाव प्राप्त झाला होता.

एक हजार रुपयांना मिळणारे कांदा बी तीन ते चार हजार रुपयांपर्यंत बाजारभावाने शेतकऱ्यांनी खरेदी केले होते. त्यातच कंपन्यांकडून आलेल्या बोगस बियाण्यांमुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. या भेसळयुक्त बियाण्यांमुळे ४० टक्के क्षेत्रावर डेंगळे आल्याचे पाहवयास मिळत आहे.

त्यातच सध्या कांद्याला बाजारभाव अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. यामुळे या वर्षी कांदा बियाणे बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात तयार केलेले दिसून येत आहे.

कांदा बी तयार करण्यासाठी नैसर्गिक परागीकरण होणे गरजेचे असते. यासाठी मधमाशी हा महत्त्वाचा घटक असतो. अलीकडच्या काळात मधमाश्‍यांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. बेसुमार व अतिशय प्रभावी अशा कीटकनाशकांनी मधमाशीचे जीवनचक्र संपुष्टात आले आहे. परागीकरण न झाल्याने कांदा बीजोत्पादन घेणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. कांदा बियाणे तयार करणारा प्लॉट यावर्षी जोमात असून मधमाश्‍या कमी असल्याने परागीकरण न झाल्याने अनेक गोंडे मोकळे आहेत. मधमाशीचे वास्तव्य नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येणार आहे.
- रघुनाथ हाडवळे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT