Wet Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Wet Drought : अकोट तालुका ओल्या दुष्काळाच्या छायेत

Drought Condition : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अकोट तालुक्यातील शेती सततच्या पावसामुळे यंदा अडचणीत सापडली आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अकोट तालुक्यातील शेती सततच्या पावसामुळे यंदा अडचणीत सापडली आहे. शेतातील पिके पिवळे होऊन त्याची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी अधिक पावसामुळे पिके जळाल्याचेही दिसून येत आहे. संपूर्ण अकोट तालुक्यात सर्वच मंडलांमध्ये ही परिस्थिती बनलेली आहे.

या वर्षी गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने खरीप पिकांची स्थिती बिकट बनली आहे. अकोलखेड, पणज, उमरा या मंडलांमध्ये बारमाही ओलिताची सोय असून संत्रा, केळी, लिंबू यासारखी पिके शेतकरी घेतात. अतिपावसामुळे, अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे फळझाडांवर विपरीत परिणाम झाला. पान, फळ गळती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याचा फटका उत्पादनावर झाला. पर्यायाने शेतकऱ्यांचे अर्थकारण अडचणीत सापडले आहेत.

या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली दिसत आहेत. तर काही ठिकाणी शेतातून पाण्याचे पाट वाहले. यामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी अकोलखेड, पणज आणि उमरा महसूल मंडलांतील शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, कृषी, महसूल विभागाकडे निवेदने दिली आहेत.

गेल्या महिन्यापासून आमच्या परिसरात कधी अतिवृष्टी, तर कधी सततचा पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिके खराब झाली आहेत. संत्रा फळबागेत फळांची मोठी गळती झाली. शासनाने पंचनामे करून त्वरित मदत द्यावी.
रोशन आतकड, शेतकरी, बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT