Watermelon Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Crop Damage : टरबूज-खरबूज नुकसानीची शास्‍त्रज्ञांकडून पाहणी

Akola Crop Loss : तेल्हारा तालुक्यात या वर्षी टरबूज, खरबूज पिकावर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात या हंगामात शेकडो एकरातील लागवड असलेले टरबूज, खरबूज पीक जागेवरच नेस्तनाबूत झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. या नुकसानाची भरपाई दिली जावी, यासाठी शेतकरी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडे मागणी रेटत आहेत.

'कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाचे गांभीर्य पाहता पथक पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शुक्रवारी (ता. २८) तेल्हारा तालुक्यात कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी भेट देत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

तेल्हारा तालुक्यात या वर्षी टरबूज, खरबूज पिकावर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील दानापूर, हिंगणी, हिवरखेड, कारला, सौंदळा, वारखेड, तळेगाव, उंबरशेवडी, दिवाणझरी, झरीबाजार, चिचारी येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात कृषिमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जिल्हा कृषी विभागालाही निवेदन देऊन नुकसानीसंदर्भात पंचनामे करण्याची व सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी (ता. २८) कृषी विभाग आणि शास्त्रज्ञांचे पथक दाखल झाले.

या भागातील काही प्लॉटची पाहणी करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव, तंत्र अधिकारी विलास वाशीमकर, जिल्हा मोहीम अधिकारी महेंद्र सालके, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ पी. के. राठोड, डॉ. प्रकाश घाटोळ, तालुका कृषी अधिकारी श्री. बुरांडे, जिल्हा गुन्ह नियंत्रण निरीक्षण सतीश दांडगे, मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत, पंचायत समिती अधिकारी भरतसिंग चव्हाण, कृषी सहायक श्री. इंगळे यांच्यासह इतर उपस्थित होते.

पथकाने देवानंद कोरडे, बंडू नराजे, गणेश वाघ, सचिन कोरडे, हरीश कोरडे आदी शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली. या वेळी सुभाष रौंदळे, श्रीपतराव विखे, ज्ञानेश्‍वर कोरडे, हरिचंद्र कोरडे, सोपान कोरडे, वैभव कोरडे, सुधाकर कोरडे, हरीश पाटील, कमल राठी, मुकूल भोपळे, राजू वानखडे, गणेश भड, दिलीप आखरे, गजानन आखरे, सचिन तिखट, शुभम इंगळे, सुभाष शित्रे, अरविंद खारोडे, मयूर होरे, दत्ता खोटे, मनोहर चेनेकर, सुजात बोडके आदी शेतकरी उपस्थित होते. तेल्हारा तालुक्यात सुमारे तीनशे हेक्टरपर्यंत पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Procurement: सात-बारावर पीकपेरा नसतानाही ५३८४ क्विंटल ज्वारीची खरेदी

Farmer Support: पशुपालनाला आता ‘कृषी’च्या धर्तीवर सवलतीत वीजपुरवठा

Agriculture Department: कृषी विभागातील अकार्यकारी पदे घोषित

Sugarcane Price: उसाला ३३०० रुपये दर निश्चित

Commercial Farming: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रुजविला व्यावसायिक शेती पॅटर्न

SCROLL FOR NEXT