Agriculture Award Agrowon
ॲग्रो विशेष

Government Agriculture Award : अकोल्यातील शेतकऱ्यांचा कृषी पुरस्कारांनी सन्मान

Agriculture Award: अकोला जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सन्मानित केले.

Team Agrowon

Akola News: प्रयोगशील शेती करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन २९ सप्टेंबरला मुंबईत गौरविण्यात आले. यामध्ये अकोला जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सन्मानित केले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या पुरस्कारात सन २०२० साठीचा कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार विवरा (ता. पातूर) येथील देविदास धोत्रे, उद्यानपंडित पुरस्कार सचिन कोरडे (हिंगणी बुद्रुक, ता. तेल्हारा), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार अमोल नेमाडे (रायखेड, ता. तेल्हारा), सन २०२१ वर्षाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिलीप ठाकरे (मालवाडा, ता. बाळापूर), सन २०२२ वर्षातील युवा शेतकरी पुरस्कार ज्ञानेश्‍वर ढोरे (महागाव, ता. बार्शीटाकळी) आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार राजेश चोपडे (माटोडा, ता. मूर्तिजापूर) यांना मिळाला आहे.

या शेतकऱ्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार वाटप झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी सचिव, कृषी आयुक्त यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह सेंद्रिय शेती, फलोत्पादन, प्रक्रिया, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात चांगले काम केले. त्यांनी केलेल्या कामाचा या पुरस्कारांमुळे सन्मान झाला. त्यांच्याप्रमाणेच इतरही शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीसाठी पुढाकार घ्यावा. त्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचे पाठबळही मिळेल.
शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT