Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान; कशाचा बोडक्याचा गतिमान!; अजित पवारांची सरकारवर टीका

Team Agrowon

State Government Politics News : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष राज्य सरकार करत आहे. वादळी पाऊस आणि गारपीटीत अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. परंतु सरकारचे त्याकडे लक्ष नाही.

सरकारचा सध्या एकच धंदा सुरू आहे, निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान, कशाचा बोडक्याचा गतिमान? अशी कठोर टीका विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी राज्य सरकारवर केली.

यावेळी त्यांनी सरकारच्या जाहिरात कार्यक्रमावर टीकेची झोड उठवली. ते रविवारी (ता.२६) जालना जिल्ह्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला परिस्थितीकडे लक्ष वेधले.

अस्मानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतची गरज आहे. परंतु सरकार केवळ आश्वासन देत आहे. शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम विरोधी पक्ष करतो आहे. शेतकरी हतबल झाला आहे.

अवकाळी पाऊस पडतोय. गारपीट होतेय. कापूस, कांदा, सोयाबीन धानाला भाव नाही. असे अनेक जटिल प्रश्न असताना मोसंबी, केळी द्राक्ष, संत्रा पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे.

या चक्रव्युहात शेतकरी अडकला आहे. त्याला मदतची गरज आहे. सरकार नुसतं करू म्हणतं पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही."

"अर्थसंकल्पात केंद्र सरकारसारखे महिन्याला ५०० रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. शेतकऱ्याला ५०० रुपये महिना देण्यापेक्षा त्याच्या शेतमाला भाव द्या. कांदा उत्पादकाला पदरचे पैसे देऊन कांदा विकावा लागू नये, एवढं तरी करा." अशी मागणी पवारांनी केली.

यावेळी पवारांनी सरकारच्या शेतकरी सन्मान निधीचा समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या वाट्याला या योजनेतून साडेतीन रुपये प्रतिदिनी येतील, याचे गणित त्यांनी उलगडून दाखवले.

पवार म्हणाले, "एका शेतकरी कुटुंबात ५ माणसं असतात. महिन्याला त्यांना ५०० रुपये देणार, एकाला महिन्याला १०० रुपये मिळणार. दिवसाला मिळणार साडे तीन रुपये.

साडे तीन रुपयांत चहा तरी येतो का? अशी शेतकऱ्यांची चेष्टा का करताय?"असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT