Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : अजित पवार बारामतीतून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Baramati Vidhan Sabha Nomination 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (ता. २८) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Team Agrowon

Baramati News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (ता. २८) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी या बाबत माहिती दिली.

सोमवारी सकाळी दहा वाजता कसब्यातून मिरवणुकीने निघून दुपारी एक वाजता तहसील कचेरीत अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर श्री क्षेत्र कण्हेरी येथे दुपारी दोन वाजता त्यांची सभा होणार असल्याची माहिती पक्ष निरीक्षक सुरेश पालवे, तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे व किरण गुजर यांनी दिली.

या सभेमधून प्रचाराची दिशा व कोणत्या मुद्यांवर प्रचाराचा भर असेल हे अजित पवार स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे. अजित पवार हे आठव्यांदा विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सलग सातवेळा अजित पवार बारामतीतून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

लोकसभेत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी अनेकदा बारामतीतून निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले होते, त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती.

कार्यकर्त्यांनी बारामतीत पवार यांचा ताफा अडवत त्यांनी उमेदवार म्हणून उभे राहण्याचा आग्रह केला होता. सर्व बाजूंनी निर्माण झालेला दबाव विचारात घेत अजित पवार यांनी बारामतीतून अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. गेल्या निवडणुकीत ते राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

FPC Conclave 2025: राज्यात 'एफपीसी'साठी स्वतंत्र धोरण, यंत्रणा तयार करु- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ च्या दोन हप्त्यांचे ३ हजार एकत्र मिळणार? ई-केवायसी अनिवार्य

Farmer Death: अकोल्यात अवैध सावकारीच्या दबावाखाली शेतकऱ्याची आत्महत्या; व्हायरल व्हिडिओने उघड केली सत्य परिस्थिती

PM Surya Ghar Yojana: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार घरांवर सौरसंच

PM Crop Insurance: सांगली जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा

SCROLL FOR NEXT