Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Sugar Election : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदाबाबत माझा हेतू स्वच्छ ः अजित पवार

Ajit Pawar News : सभासदांचे भले करण्यासाठी मलाही ‘माळेगाव’चे चेअरमन व्हायचे आहे. चेअरमन होताना सर्व जाती-धर्मांतील लोकांना, ज्येष्ठांना बरोबर घेणार आहे.

Team Agrowon

Baramati News : वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. हेही एकेकाळी साखर कारखान्याचे चेअमन होते. तसे आता मीही उपमुख्यमंत्री आहे. सभासदांचे भले करण्यासाठी मलाही ‘माळेगाव’चे चेअरमन व्हायचे आहे.

चेअरमन होताना सर्व जाती-धर्मांतील लोकांना, ज्येष्ठांना बरोबर घेणार आहे. सभासदांना राज्यात उच्चांकी ऊस दर देईन. विरोधक राजकारणापायी माझ्या हेतूबाबत साशंकता व्यक्त करतात. सभासदांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव (ता. बारामती) कारखाना निवडणूक प्रचार प्रारंभ सभेत शनिवारी (ता. १४) पाच वर्षे मीच माळेगावचा चेअरमन होणार, अशी घोषणा खुद्द अजित पवार यांनी केली होती. त्या घोषणेमुळे माळेगावच्या कार्यक्षेत्रात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे.

त्यानुसार रविवारी (ता. १५) पळईमाळ येथे अशोकराव मुळीक आदींच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. या वेळी माळेगावचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप, सतीश काकरे, दत्तात्रेय येळे, सुभाष खलाटे, दथरथ धुमाळ, विजय फाळके, राजेंद्र भोईटे, विजय धुमाळ, अशोकराव मुळीक, उमेश धुमाळ, बाळासाहेब काळभोर, दीपक डांगे आदींनी निर्णायक भूमिका मांडली.

पवार म्हणाले, ‘‘महाराष्ठ्रात माळेगावचे नाव उंच्चांकी ऊसदराच्या बाबतीत आदर्शवत घेतले जाते. हा लौकिक पुढील पाच वर्षे मी चेअरमन पदावरून कायम ठेवणार आहे. विरोधक निवडणुकीत मते मिळविण्यासाठी विनाकारण माळेगावची बदनामी करीत आहेत.

माळेगाव जर कर्जबाजारी असता, तर बँकांनी कर्जपुरवठा केला असता का? माळेगावची अर्थिक स्थिती मजबूत आहे. विरोधक मात्र सातत्याने कर्जाची भीती दाखवित आहेत. सभासद बंंधूंनो माळेगावचा कारभार माझ्या हातात द्या, तुमच्या मताचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.’’

उमेदवारांची शपथ

पणदरे गटातील निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांनी आज भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा प्रारंभ केला. या वेळी उमेदवार स्वप्नील शिवाजी जगताप म्हणाले, ‘‘माळेगावचा सभासद कष्टाळू आहे. त्यांच्या उसाचे पैसे खर्चाच्या तुलनेत अधिकचे मिळाले पाहिजेत, या मताचा मीही सहमत आहे.

सभासदांनी निळकंठेश्वर पॅनेलबरोबर मला मोठ्या मताधिक्क्याने निवडणू दिले, तर कारखान्याचा कोणताही भत्ता अथवा संचालकांना मिळणाऱ्या सुविधा घेणार नाही, अशी शपथ भैरवनाथ मंदीरात घेत आहे.’’ या वेळी जगताप यांच्या भूमिकेचे सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT