Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Malegaon Sugar Factory Election : माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल २५ जून रोजी जाहीर झाला. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकत सत्ता राखली.

Team Agrowon

Baramati News : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ‘ब’ वर्ग संस्था मतदार संघातून विजयी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे सहकाराच्या राजकारणात ते सक्रिय परतले आहेत.

तसेच, उपाध्यक्षपदी सर्वसाधारण महिला राखीव गटातून विजयी झालेल्या संगीता बाळासाहेब कोकरे (पणदरे) यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ‘माळेगाव’च्या संचालिक म्हणून २५ वर्षे धुरा सांभाळली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निवडीला विरोधी गटाचे संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला आहे. या बाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे तक्रार केली आहे. माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल २५ जून रोजी जाहीर झाला. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकत सत्ता राखली.

विरोधी गटाला एका जागेवरच समाधान मानावे लागले. त्यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे एकमेव निवडून आले. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ५) निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्या आधिपत्याखाली अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शांततेत पार पडली. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेचे प्रोसेसिंग पूर्ण केले.

दरम्यान, ‘माळेगाव’चे अध्यक्षपद आपण स्वतःकडेच ठेवणार असल्याचे अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. मात्र, उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात संगीता कोकरे यांना संधी मिळाली.

विरोधकांची तक्रार

संचालक चंद्रराव तावरे यांनी माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांच्या निवडीबाबत आक्षेप घेतला. सहकारी कायद्याच्या तरतुदीनुसार ऊस उत्पादक ‘अ’ वर्ग सभासदांनाच माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष होता येते.

अजित पवार हे ‘ब’ वर्ग संस्था मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते ऊस उत्पादक सभासद नाहीत. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झालेल्या प्रक्रियेविरुद्ध आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे तक्रार केली आहे, असे तावरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन व गवार दर टिकून; आले-पपई दरात सुधारणा, तर भेंडी दर स्थिर

Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर वाढणार; बुधवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज

Farmer Compensation Scam : अनुदानाचा मलिदा लाटणाऱ्यांवर गुन्हे

Lumpy Skin Disease : ‘लम्पी’मुळे मृत जनावरांच्या मालकांना मदतीची अपेक्षा

Solapur Water Stock : सात मध्‍यम प्रकल्पांत ८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT