Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : विरोधकांचा विजय झाल्यावर ईव्हीएम परफेक्ट असते

Sharad Pawar : शरद पवार साहेबांची आणि आमची भेट झाली असती तर मी, मकरंद पाटील, सचिन पाटील, हसन मुश्रीफ सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले असते. मात्र टायमिंग जुळले नाही, त्यासाठी मी पोलिस दलावरही चिडलो.

Team Agrowon

Satara News : लोकसभेला महायुतीचा महाराष्ट्रात दारूण पराभव झाला, तो आम्ही मान्य केला. त्या वेळी त्यांचा विजय झाल्यामुळे ईव्हीएम परफेक्ट होते. कर्नाटक, पंजाब, तेलंगणा, दिल्ली, पश्चिम बंगाल ही राज्य विरोधकांच्या ताब्यात गेली आहेत. त्यामुळे ईव्हीएमला दोष देण्याचे काहीच कारण नाही.

यश-अपयश हे मतदारांवर अवलंबून असते. मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी महायुती आणि घटक पक्षांचे नेते, उमेदवार यशस्वी झाले. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. लोकांना जे पटते तेच लोक करतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावर लगावला.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार सोमवारी (ता. २५) कऱ्हाडला आले होते. अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार मकरंद पाटील, आमदार सचीन पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘शासन आणि राज्यातील साडेतीन कोटी जनतेच्या वतीने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. विधानसभा निवडणुकीत वाचाळविरांची भाषणे ऐकल्यानंतर यशवंतरावांच्या विचारांची गरज असल्याचे जनतेच्या लक्षात आले.’’ राज्यातील सत्ता स्थापनेबद्दल ते म्हणाले, ‘‘माझी आणि एकनाथ शिंदे यांची रविवारी (ता. २४) गटनेतेपदी निवड झाली.

भाजपचीही निवड होईल. त्यानंतर सहकारी, वरिष्ठ यांच्याशी चर्चा करून राज्याला स्थिर सरकार देऊ. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच यश मिळालेले आहे.

या वेळी महाराष्ट्राने वेगळेच काही ठरवले होते. राज्यात चांगल्या योजना दिल्या, पंतप्रधान मोदींनी आम्हाला साथ केली. महिला, शेतकरी, युवा-युवतींसाठी योजना राबवल्या. त्यात सर्वांना सामावून घेतले. ‘लाडक्या बहिणीं’ना आम्हाला चांगली साथ दिली. त्यामुळे मोठे यश मिळाले.’’

राष्ट्रवादी राजवट लागू होण्यासंदर्भात ते म्हणाले, राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रविवारीच निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना दिली आहे. आमच्याकडे मोठे बहुमत आहे.

विरोधी पक्षनेता करण्याइतपतही जागा विरोधी पक्षाला मिळालेल्या नाहीत. मात्र तरीही आम्ही विरोधकांचा मान-सन्मान ठेवण्याची परंपरा आहे कायम ठेवू. ते प्रश्न मांडतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू. निवडणुकीत आम्ही ज्या योजना, आश्वासने दिलेली आहेत ती पाळणे हे आमचे कर्तव्य आहे.’’

...तर शरद पवारांचेही दर्शन घेतले असते

आमदार रोहित पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट झाली. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘‘वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे ही आपली संस्कृती आहे. शरद पवार साहेबांची आणि आमची भेट झाली असती तर मी, मकरंद पाटील, सचिन पाटील, हसन मुश्रीफ सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले असते. मात्र टायमिंग जुळले नाही, त्यासाठी मी पोलिस दलावरही चिडलो.

त्यामुळे आता काय करायचे, अशी मिश्कील टिप्पणी करून रोहित मला भेटला, मी त्याला शुभेच्छा दिल्या, असे त्यांनी सांगितले. अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आले असताना अजित पवार यांनी रोहित पवार यांना, पाया पड काकाच्या, तू थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर काय झाले असते? असा मिश्किल टोला लगावला. त्यादरम्यान रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या पाया पडून गालात हसून ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Farming : दोन हजारांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधीची उड्डाणे

Rabi Weed Management : रब्बी पिकातील तण व्यवस्थापन

Soybean Procurement : केंद्राचा सोयाबीन ओलाव्याबाबतचा नियम बासनात, नियम लागू करावा; संचालक गुंदेकर यांची मागणी

Jaggery Rate Kolhapur : कर्नाटकच्या गुळाची कोल्हापूर ब्रँडने विक्री; संतप्त शेतकऱ्यांनी सौदे पाडले बंद

Mushroom Farming : अळिंबी संशोधन प्रकल्पातून घडताहेत उद्योजक

SCROLL FOR NEXT