AI Technology Agrowon
ॲग्रो विशेष

AI Technology : अचूक शेतीसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल ; परडयू विद्यापीठाचे डॉ. धर्मेंद्र सारस्वत यांचे प्रतिपादन

Artificial Inteligence : अचूक शेतीसाठी ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि चॅट जीपीटी या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्यामुळे वेळेत माहितीचे संकलन, पृथक्करण आणि निष्कर्ष काढणे शक्य होईल.

Team Agrowon

Parbhani News : परभणी ः अचूक शेतीसाठी ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि चॅट जीपीटी या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. त्यामुळे वेळेत माहितीचे संकलन, पृथक्करण आणि निष्कर्ष काढणे शक्य होईल. एआय, चॅट-जीपीटी तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करावे लागतील, असे प्रतिपादन अमेरिकेतील परडयू विद्यापीठाच्या कृषी आणि जैव अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेंद्र सारस्वत यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शिक्षण संचालनालयातर्फे आयोजित उच्च अभ्यासक्रम संरचनेमध्ये विशाल दृष्टिकोनात्मक भाषेच्या मॉडेलची एकत्रीकरण या विषयावर शनिवारी (ता. २५) डॉ. सारस्वत यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा होते.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.सारस्वत म्हणाले, की एआयचे कौशल्य काळजीपूर्वक शिकणे आवश्यक आहे. काळजीपूर्वक वापर होणेही आवश्यक आहे. परडयू विद्यापीठात याबद्दलचे ज्ञान विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातच दिले जाते. चॅट-जीपीटी द्वारे संशोधन करण्यासाठी बंधन घातले जाते.

यापासून होणारे चांगले आणि दुष्परिणांची ही माहिती दिली जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने उच्च अभ्यासक्रमाचे संरचनेचे मॉडेल्स बनवण्यासाठी आणि विस्तार कार्यात शेतकऱ्यांना सुलभ भाषेमध्ये समजण्यासाठी महत्त्वपूर्ण उपयोग होतो. परडयू विद्यापीठांमध्ये ‘ॲड दोस्त’ मॉडेल विकसित केलेले आहे, असे नमूद केले. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की आगामी काळ एआय, चॅट-जीपीटीचाच आहे.

शेतकऱ्यांच्या आणि लाभधारकांच्या गरजेनुसारच तंत्रज्ञान विकसित करावे लागेल यामध्ये एआय, चॅट-जीपीटीचा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सूत्रसंचालन करून आभार डॉ. वीणा भालेराव यांनी मानले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, आचार्य, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT