Agriculture Export Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Dubai Tour : ‘ॲग्रोवन’चा दुसरा दुबई दौरा ६ ऑक्टोबरपासून

Agriculture Export : जागतिक शेतीमालाच्या निर्यातीचे तंत्र उलगडून दाखविणारा ‘ॲग्रोवन’चा पहिला दुबई कृषी अभ्यास दौरा यशस्वी होताच आता दुसऱ्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे.

Team Agrowon

Pune News : जागतिक शेतीमालाच्या निर्यातीचे तंत्र उलगडून दाखविणारा ‘ॲग्रोवन’चा पहिला दुबई कृषी अभ्यास दौरा यशस्वी होताच आता दुसऱ्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या या दौऱ्यात शेतकरी तसेच व्यावसायिकांना ‘ॲग्रा-मी’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मिळेल. शिवाय अभ्यासाबरोबरच फावल्या वेळात स्थलदर्शन आणि खरेदीचा आनंदही लुटता येईल.

शेतीमाल निर्यात व्यवसायात उतरण्याची इच्छा अनेकांची असते. परंतु, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळेच अशा शेतकरी, नवउद्योजक व तरुण व्यावसायिकांसाठी ‘ॲग्रोवन’तर्फे दुबईच्या शेतीमाल अभ्यास दौरा संकल्पना राबवली जात आहे. २८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान पहिला दौरा उत्साहात पार पडला.

राज्याच्या विविध भागातील शेतकरी, व्यावसायिक या दौऱ्यात सहभागी झाले. त्यांना दुबईत थेट आयातदारांना भेटण्याची संधी मिळाली. त्यामुळे यातील काही शेतकरी आता शेतीमाल निर्यातीबाबत मध्यस्थाविना संबंधित आयातदार संस्थांशी व्यावसायिक जुळवाजुळव करीत आहेत.

गुणवत्ता व चवीतील वेगळेपणा तसेच वाहतुकीसाठी लागणारा कमी कालावधी यामुळे भारतीय भाजीपाला व फळांना दुबईतून वाढती मागणी आहे. तेथील आयातदार भारतीय शेतीमाल दुबईला पुरवून पुढे युरोपातदेखील पाठवत असतात.

अभ्यास दौऱ्यात शेतीमाल निर्यातदार, तज्ज्ञ व प्रशिक्षक असलेल्या धनश्री शुक्ल यांच्याकडून उत्कृष्ट मार्गदर्शन लाभते. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघ तसेच कृषी क्षेत्रातील कोणत्याही संस्था, गट, व्यक्ती दौऱ्यात सहभागी होऊ शकतात.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अभ्यास दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ७ व ८ ऑक्टोबरला दुबईतील ‘ॲग्रा-मी’ या शेतीविषयक प्रदर्शनाला भेट देण्याची संधी लाभणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांचा सहभाग असलेल्या आधुनिक शेती, हायड्रोपोनिक्स, फलोत्पादन, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, नवतंत्रज्ञानाचे स्टॉल्स बघता येतील.

अल अवीर, अल रास मार्केटला भेट देऊन तेथे विविध देशांतून आलेल्या भाजीपाला, फळे आणि इतर कृषी उत्पादनांची हाताळणी, खरेदी-विक्री कशी होते, हे जाणून घेता येईल. मीना बाजार, लुलु मार्केट, दुबई मॉल, बुर्ज खलिफा, जबेल अली पोर्ट तसेच दुबईतील ‘कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया’ला भेट देता येणार आहे. तेथे आयात-निर्यात व्यवसायात कार्यरत असलेल्या महाराष्ट्रीयन व्यावसायिकांशी चर्चा करण्याची संधी हे दौऱ्याचे खास वैशिष्ट्य असेल.

दौऱ्यासाठी संपर्क आणि शुल्क...

दौऱ्याचे एकूण शुल्क प्रतिव्यक्ती १.२० लाख रुपये अधिक जीएसटी असून त्यात सर्व खर्च समाविष्ट आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ५ सप्टेंबरपर्यंत क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी. श्री. गजानन शिंदे (९५४५५४१९१७) यांच्याशी थेट संपर्क साधता येईल.

शेतीमाल आयात निर्यातीमधील सर्व बारकावे या अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांना शिकता येतील. थेट खरेदीदारांशी, आयातदारांशी चर्चा करण्याची, आयात माल हाताळणीच्या सुविधा पाहण्याची संधी त्यांना मिळेल.
- धनश्री शुक्ल, निर्यात तज्ज्ञ व व्यावसायिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Success Story: एकी हेच कोसले कुटुंबाचे धन

Rose Farming: गुलाब प्रक्रियेतून प्रगतीचा दरवळ

Agriculture Culture: शेती, भाषा आणि संस्कृती

University Leadership: संशयकल्लोळ दूर व्हावा

Monsoon Rainfall: राज्यात २६५ तालुक्यांत शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस

SCROLL FOR NEXT