Agrowon Grape Expo Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Grape Expo : ॲग्रोवन द्राक्ष प्रदर्शनाची द्राक्ष पंढरीत जल्लोषात सुरुवात

Grape Framing : द्राक्ष शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानासमवेत राज्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी हे तीनदिवसीय प्रदर्शन पर्वणी ठरत आहे.

Team Agrowon

Nashik News : देशभरात द्राक्ष उत्पादन व निर्यातीमध्ये नाशिकची ओळख आहे. येथील द्राक्ष उत्पादकांना नावीन्यपूर्ण माहिती, विविध तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या माध्यमातून ‘ॲग्रोवन एक्सक्ल्यूझिव्ह ग्रेप एक्स्पो’चे आयोजन ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान नाशिक शहरात ठक्कर्स डोम, एबीबी सर्कळजवळ, त्र्यंबक रोड येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. ३०) मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात करण्यात आले. या वेळी द्राक्ष उत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

द्राक्ष शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानासमवेत राज्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी हे तीनदिवसीय प्रदर्शन पर्वणी ठरत आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ‘पूर्वा केमटेक’चे व्यवस्थापकीय संचालक संजय पवार, ‘ॲग्री सर्च इंडिया’चे संचालक पंडित खांदवे, ‘ऑर्चिड क्रॉप सायन्स’चे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर गागरे, ‘एशियन ॲग्रो टेक्नॉलॉजीस’चे प्रतिनिधी संतोष वाघमारे, ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ‘ॲग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले आदी उपस्थित होते.

सप्टेंबरअखेर गोडी बहर छाटणीला गती येते. याच पार्श्‍वभूमीवर हे प्रदर्शन होत असल्याने द्राक्ष उत्पादक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत. प्रदर्शनात द्राक्ष उत्पादनासंबंधी कीड व रोग नियंत्रणासाठी विविध कृषी निविष्ठाची शृंखला, अद्ययावत सूक्ष्म सिंचन व फवारणी प्रणाली, द्राक्ष पिकसंबंधी तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण यांत्रिकीकरणाची मांडणी करण्यात आली आहे. तसेच मोफत पाणी परीक्षण शिबिर व लगेचच तपासणी रिपोर्ट, यासह प्रदर्शनाला भेट देणाऱ्यास लकी ड्रॉद्वारे भेटवस्तू जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिकसह नगर, पुणे, धुळे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पूर्वा केमटेक हे आहेत. प्रदर्शन पॉवर्ड बाय ऑरचिड कंपनी आहे. तर सहप्रायोजक ॲग्री सर्च (इंडिया) प्रा. लि., आनंद ॲग्रो केअर, एशियन ॲग्रीटेक्नोलॉजीस (इंडिया) प्रा. लि., बायस्टॅड इंडिया लि., गोदावरी ॲग्रो, वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजिस प्रा.लि., शक्तिमान या कंपन्या आहेत. प्रदर्शनात वितरित होणारी बक्षिसे सोनी गिफ्ट्स प्रा. लि. (नाशिक)द्वारे प्रायोजित आहेत.

शिवसेना शेतकरी संवाद दौऱ्याची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची शेतकरी संवाद यात्रा राज्य दौऱ्यावर आहे. त्यानिमित्ताने शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी भेट देत प्रदर्शनाची माहिती घेतली. शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

द्राक्षतज्ज्ञ डॉ. एस. डी. सावंत यांचे आज मार्गदर्शन

आज (ता. १) व उद्या (ता. २) द्राक्ष पिकासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. द्राक्ष उत्पादकांच्या गरजा व त्यावर उपाय देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल. आज दुपारी १२ ते २ या या वेळेत द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. एस. डी. सावंत हे ‘गोड्या छाटणीनंतरचे नियोजन व रासायनिक अवशेष व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT