Grapes Farming : द्राक्षांची छाटणी करताना 'ही' काळजी घ्या

Team Agrowon

छाटणीची लगबग

सध्या द्राक्ष बागांमध्ये छाटणीची लगबग सुरु आहे. काही भागात छाटणी उरकलेली आहे. अशा लवकर छाटणी झालेल्या बागेत प्री ब्लूम तर काही ठिकाणी मणी सेटिंगची अवस्था असेल. 

Grapes Farming | Agrowon

घड निघण्याची अवस्था

घड निघण्याच्या अवस्थेत असलेल्या बागेत पाऊस किंवा पावसाळी वातावरण असल्यास गोळीघड किंवा घड जिरण्याची समस्या येऊ शकते.

Grapes Farming | Agrowon

सायटोकायनीनयुक्त संजीवक ६ बीए १० पीपीएम

बागेत पोंगा अवस्थेत म्हणजेच एक ते दोन पानांच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागेत एक दिवसानंतर सायटोकायनीनयुक्त संजीवक ६ बीए १० पीपीएम या प्रमाणात फवारा.

Grapes Farming | Agrowon

पालाश द्या

त्यानंतर पालाश ०-०-५० अर्धा ते पाऊण ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवाराव. या वेळी मुळे चांगली कार्यक्षम असल्यामुळे जमिनीतून पालाश द्यावा.

Grapes Farming | Agrowon

कुजण्याची शक्यता 

घडात पाणी साचल्यानंतर पाणी साचल तर घड कुज होण्याची शक्यता असते.

Grapes Farming | Agrowon

फवारणी

अशा ठिकाणी झिंक, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची अर्धा ग्रॅम प्रमाणे एक फवारणी आणि पालाशची एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे वेगळी फवारणी करा.

Grapes Farming | Agrowon

मणी सेटिंग

मणी सेटिंगची अवस्था असलेल्या बागेत संजीवकांचा वापर महत्त्वाचा आहे. येथे जीए ३ (४० पीपीएम) आणि सीपीपीयू १ पीपीएम या प्रमाणे फवारणी किंवा घड बुडवावेत. 

Grapes Farming | Agrowon

विरळणी

घडातील मण्याची विरळणी करून घ्यावी. लवकर छाटणीच्या व काळ्या जातीच्या म्हणजेच नानासाहेब पर्पल वाणा सारख्या द्राक्ष बागेत मण्यांची संख्या ७० ते ७५ इतकी राखल्यास घडाला एकसारखा रंग मिळण्यास मदत होईल.

Grapes Farming | Agrowon
Grapes Farming | Agrowon