Agricultural Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : शेतीला पाणी कमी पडू देणार नाही

Water For Agriculture Irrigation : काळम्मावाडी धरण आणि कालव्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मुबलक पुरवण्याची जबाबदारी आमची असून, कोणत्याही परिस्थितीत शेतीला पाणी कमी पडू देणार नाही.

Team Agrowon

Kolhapur News : डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेल इतक्या पाण्याचा विसर्ग कालव्यावर बसवलेल्या गेटमधून होईल, शेतीला पाणी कमी पडू देणार नसल्याचा विश्‍वास आमदार प्रकाश आबीटकर यांनी दिला.

तळाशी (ता. राधानगरी) येथे दूधगंगा धरणाच्या डाव्या कालव्यावरील थेट विमोचक (पाणी सोडण्याचे गेट) बसविण्याच्या कामाचा प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, सहायक अभियंता अजिंक्य पाटील, उपअभियंता प्रवीण पारकर, नामदेव चौगले, शामराव भावके, विश्‍वनाथ पाटील, शहाजी पाटील, सुभाष पाटील, भिकाजी हळदणकर उपस्थित होते.

आमदार आबीटकर म्हणाले, की गतवर्षी डाव्या कालव्यावरील शेतीला पाणी कमी पडत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत कालव्याशेजारी असणाऱ्या ओढ्यावर गेट बसवून शेतीला पाणी देण्याचे आश्‍वासन दिले होते.

ते पूर्ण झाले आहे. काळम्मावाडी धरण आणि कालव्यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मुबलक पुरवण्याची जबाबदारी आमची असून, कोणत्याही परिस्थितीत शेतीला पाणी कमी पडू देणार नाही.

अरुण जाधव म्हणाले, की कालव्याचे अस्तरीकरण काम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. आमदार आबीटकर यांनी वचनपूर्ती केल्याने शेतकऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागाला आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT