Land Record Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Tax : शेतसारा ऑनलाइन भरता येणार

Team Agrowon

Pune News : पुणे महापालिकेच्या मिळकतकराच्या धर्तीवरच आता जमीनविषयक महसूल कर अर्थात शेतसारा ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाने याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्ह्यात सुमारे १९०० गावे आहेत. यातील सुमारे १ हजार ५०० गावांमध्ये तलाठी स्तरावरून ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता पुढील टप्प्यात लवकरच या गावांमध्ये शेतसारा भरण्याची ऑनलाइन नोटीस बजावली जाणार असून शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन कर भरता येणार आहे.

शेतसारा वसुलीसाठी तलाठ्यांना खातेदारांच्या घरोघरी फिरावे लागत होते. तसेच या कराची वसुली वेळेवर होत नव्हती. तसेच कर किती थकीत आहे, याची सुद्धा माहिती खातेदारांना नसते.

या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या सुविधेमुळे सर्व्हे नंबरनिहाय अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम किती होत आहे. थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने ई-चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. https://echawadicitizen.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर शेतसारा भरता येणार आहे.

शेतीचा कर भरण्याबरोबरच बिनशेती कर अर्थात ‘एनए’कर सुद्धा भरण्याचा पर्याय असेल. जिल्ह्यातील उर्वरित ४०० गावांमध्ये तलाठी स्तरावरून कर भरण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होईल, त्यादृष्टीने काम सुरू आहे.

वसुलीत अडचणी

शेतीचा कर हा अल्प असल्याने या कराची वसुली अपेक्षित होत नाही. थकबाकीची रक्कम मोठी झाल्यावर हा कर वाढलेला दिसतो. थकबाकीची रक्कम ही तलाठी कार्यालयात गेल्यावरच कळते. तसेच आता घरबसल्या ऑनलाइन सातबारा उतारा असल्याने तलाठी कार्यालयात सुद्धा नागरिकांना जावे लागत नाही. त्यामुळे हा कर वसूल होत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT