Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Mandal Office : नसरापुरातील कृषी मंडल कार्यालय बेपत्ता

Agriculture Office : नसरापूर (ता. भोर) येथील कृषी मंडलकार्यालय तीन महिन्यांपासून बंद आहे. येथे शेतकरी चकरा मारत आहेत.

Team Agrowon

Pune News : नसरापूर (ता. भोर) येथील कृषी मंडलकार्यालय तीन महिन्यांपासून बंद आहे. येथे शेतकरी चकरा मारत आहेत. चौकशी केली असता कार्यालयाचे स्थालांतर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र मूळ ठिकाणी जागा बदलाची कोणतीही सूचना किंवा फलक लावलेला नाही त्यामुळे हे कार्यालय बेपत्ता झाले असून, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

कृषी संबंधित मंडल कार्यालय बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जय शिवराय किसान संघटनेचे राज्याध्यक्ष श्‍यामसुंदर जायगुडे व बळीराजा शेतकरी संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यशवंत कदम यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून जायगुडे, कदम व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, दत्तात्रेय शिंदे, ऋषिकेश खेडकर यांनी मंगळवारी (ता.२९) काही शेतकरी व प्रसारमाध्यमांसह या कार्यालयास भेट दिली.

यावेळी कार्यालय बंद दिसले. त्यांना कार्यालय स्थालांतरीत झाल्याचे सांगितले. मात्र, याबाबत जुन्या कार्यालयात स्थालांतराची माहिती देणारा कोणताही फलक लावला नसल्याने शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.

दरम्यान, दूरध्वनी करून अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. काहीवेळातच नसरापूरचे कृषी मंडलाधिकारी सूरज पाटील व कृषी कर्मचारी राहुल दिघे यांनी तिथे आले व कार्यालय मोडकळीस आल्याने गेले तीन महिन्यांपासून महामार्गानजीकच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले असल्याचे सांगितले.

कार्यालयाजवळ माहिती फलक लावला होता. मात्र, तो पडला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुन्हा फलक लावून तसेच संपर्क साधून शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल, अशी ग्वाही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Subsidy Scheme: कर्ज व्याज परतावा योजना बनली सुलभ, पारदर्शक

Gosevak Protest: गोसेवकांचे आजपासून राज्यभर आमरण उपोषण

PMFME Scheme Application: पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी अर्जांचे आवाहन

Crop Insurance Payout: कापणी प्रयोगातील उत्पादनाधारेच पीकविमा भरपाई द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Rain Damage Relief Fund: नुकसानीच्या मदतीपोटी ५३ कोटी रुपयांचे वितरण

SCROLL FOR NEXT