Agriculture Department Scam: आवटे समितीच्या अहवालात दोन अधिकाऱ्यांवर ठपका

Awate Committe Report: कृषी अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या नावे कंपन्या स्थापन केल्याची केवळ दोन प्रकरणे आवटे समितीने शोधून काढली आहेत. राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी.
Agriculture Scam
Agriculture ScamAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या नावे कंपन्या स्थापन केल्याची केवळ दोन प्रकरणे आवटे समितीने शोधून काढली आहेत. राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी, असे मत कृषी आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

राज्यातील कृषी अधिकाऱ्यांनी नात्यागोत्यांच्या नावे विविध कंपन्या स्थापन केल्याची मूळ तक्रार आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशावरून कृषी विभागाचे तत्कालीन विस्तार व प्रशिक्षणसंचालक विनयकुमार आवटे यांची चौकशी स्थापन केली होती. या समितीच्या अहवालात नेमकेकाय नमूद केले आहे, याविषयी राज्यभर उत्सुकता आहे.

Agriculture Scam
Agriculture Officers Issue: गुणनियंत्रणाचे अधिकार गेल्याने जि.प.चे अधिकारी कासावीस

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, समितीचा अहवाल आयुक्तालयाला सादर करण्यात आला आहे. त्यात कोल्हापूर विभागाचे निवृत्त कृषी सहसंचालक उमेश गोपाळ पाटील यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांच्या पत्नी सौ. साधना उमेश पाटील या कृषी सेवा बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर इंडिया प्रा. लि. या खत उत्पादक कंपनीच्या संचालक असल्याचे आढळून आले आहे. ही कंपनी २०२१ मध्ये स्थापन झाली असून २०२३ मध्ये कंपनीची उलाढाल अडीच कोटी रुपयांपर्यंत होती, असे आवटे समितीच्या अहवालात म्हटले आहे.

दक्षता पथकाचे तत्कालीन वादग्रस्त उपसंचालक किरण जाधव यांच्या मालमत्तेची तपशीलवार माहितीदेखील या अहवालात देण्यात आली आहे. श्री. जाधव यांनी आई श्रीमती विमल शामराव जाधव यांच्या नावे २०११ ते १८ या केवळ सात वर्षांत ३४ लाखांची जमीन खरेदी केली आहे. पत्नी सौ. संगीता जाधव यांच्या नावे साडेनऊ लाखांची; तर मुलगी श्रेयाच्या नावाचे साडेदहा लाखाची जमीन खरेदी दाखवली आहे.जाधव कुटुंबाने दहा वर्षांत ९ हेक्टर जमिनीची खरेदी केली आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Agriculture Scam
POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक

किरण जाधव यांनी २०२२ मध्ये सातारा जिल्ह्याच्या दहिवाडी भागात कुटुंबाच्या नावाने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. या कंपनीचा पत्ता किरण जाधव यांच्याच नावे आहे. या कंपनीला सरकारी योजनेतून साडेबारा लाख रुपये अनुदानापोटी मिळाल्याची स्पष्ट नोंद आवटे समितीच्या अहवालात आहे.

दुसऱ्या बाजूला हा अहवाल अर्धवट व संभ्रम तयार करणारा आहे, असेही काही अधिकाऱ्यांचे मत आहे. कारण याच अहवालात असेही म्हटले आहे, की कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या नावे कंपन्या स्थापन करून गैरप्रकार केल्याच्या तक्रारी मोघम स्वरूपाच्या आहेत. अशा तक्रारीची सविस्तर चौकशी शक्य नाही. अधिकाऱ्याचा थेट सहभाग असल्याची बाब निदर्शनास आलेली नाही. याबाबत विशेष चौकशी करण्याबाबत शासनानेच निर्णय घ्यावा.

आर्यन पाटील यांना क्लीन चिट

सांगलीचे तत्कालीन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आर्यन पाटील यांना आवटे समितीने क्लीन चिट दिली आहे. पाटील यांच्या नावे आर. एन. ॲग्रो नावाची कंपनी असल्याची तक्रार आली होती. मात्र, पाटील निवृत्त झाल्यानंतर सहा वर्षांनी कंपनी स्थापन झाली आहे. तसेच, कंपनीत पाटील यांचा सहभागदेखील नाही, असे आवटे समितीने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com