Shivraj Singh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chauhan : कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधणार संवाद

Nashik Visit : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज (ता. ३) सकाळी ११.३० वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रात ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रम होईल.

Team Agrowon

Nashik News : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज (ता. ३) सकाळी ११.३० वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रात ‘किसान सुसंवाद’ कार्यक्रम होईल. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे अध्यक्षस्थानी असतील.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान शेतकरी असलेले उद्योजक, आदिवासी व महिला, तसेच शेतकरी स्वयंसाह्यता गटांशी संवाद साधतील. विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित तयार केलेल्या शिक्षणक्रमाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल.

हा शिक्षणक्रम विद्यापीठातर्फे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) व कॅनडास्थित कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगचे कॉमनवेल्थ एज्युकेशनल मीडिया सेंटर फॉर एशिया (कोल-सेमका), कार्यालय नवी दिल्ली यांच्यासोबतच्या सामंजस्य करारानुसार तयार केला आहे.

कृषी विज्ञान केंद्राने विद्यापीठ परिसरात नारळाच्या झाडांचे पुनर्रोपण केले आहे. त्यावर आधारित ‘नारळाच्या झाडांचे पुनर्रोपण : पर्यावरण संवर्धन’ ही चित्रफित, तसेच कृषी विज्ञान केंद्र व पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माहितीपुस्तकांचे त्यांच्या हस्ते प्रकाशन होईल.

विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्राने २५ प्रकारची विविध धान्ये व फळ पिकांच्या माहितीचे क्यूआर कोड तयार करून त्याचा तक्ता तयार केला आहे. ही शेतपिकांच्या क्यूआर कोड तक्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT