Shivraj Singh Chouhan  Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chouhan : कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची कॉँग्रेसवर टिका

Budget 2025 :शिवराज सिंह चौहान म्हणाले, "विरोधकांना कृषी आणि शेतकरी कल्याणावर चर्चा करायची नाही. कृषी चर्चेदरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला, तर हे स्पष्ट होईल की त्यांच्या हेतू वेगळे आहेत आणि ते शेतकरी विरोधी आहेत." ​असं चौहान म्हणाले.

Dhananjay Sanap

​Agriculture Issue : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकत्याच झालेल्या संसदेतील गोंधळावर विरोधकांवर तीव्र टीका केली आहे. गुरुवारी कृषी विषयक चर्चेची योजना होती, परंतु विरोधकांच्या अडथळ्यामुळे ती चर्चा होऊ शकली नाही. त्यावरून शिवराजसिंह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

शिवराज सिंह चौहान म्हणाले, "विरोधकांना कृषी आणि शेतकरी कल्याणावर चर्चा करायची नाही. कृषी चर्चेदरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला, तर हे स्पष्ट होईल की त्यांच्या हेतू वेगळे आहेत आणि ते शेतकरी विरोधी आहेत." ​असं चौहान म्हणाले.

पुढे चौहान यांनी म्हणाले, "आम्ही एक वर्षापासून या चर्चेची प्रतीक्षा करत होतो, ज्यात विरोधकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळेल. परंतु विरोधकांनी गोंधळ केला." असंही चौहान म्हणाले. यावेळी चौहान यांनी कृषी आणि शेतकरी कल्याणासाठी मोदी सरकारच्या प्रयत्नांचेही कौतुक केले.​

शेतकऱ्यांचे कल्याण मोदींसाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार अनेक योजना चालवते आहे. त्यांनी विरोधकांना आग्रह केला की, किमान आज चर्चा होऊ द्यावी, चर्चा सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा, सार्थक वाद घालावा, जेणेकरून खरेपणाने आपण सर्व शेतकरी कल्याणाचे काम पुढे घेऊन जाऊ शकू, असा दावाही कृषिमंत्र्यांनी केला.

दरम्यान, १९ डिसेंबर २०२४ रोजी संसद भवनात झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या इतर सदस्यांसोबत भाजपाच्या सदस्यांमध्ये घुसून धक्काबुक्की केली आणि गोंधळ घातला, त्यामुळे भाजपाचे आमदार प्रताप सारंगी हे जखमी झाले, असा दावाही केला गेला होता.

शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर त्यांच्या कृतीसाठी राहुल गांधी यांना माफी मागण्याची मागणी केली होती. त्यावेळी कॉँग्रेसच्या गोंळावरून कॉँग्रेसवर चौहान यांनी टिका होती.​

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT