Agriculture Departmental Office  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Departmental Office : कृषिमंत्र्यांचे नाशिक येथे विभागीय कार्यालय सुरू समस्यांची सोडवणूक, शासनसेवा अधिक सुलभ करण्याचा उद्देश

Adv. Manikrao Kokate : कृषिमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अॅड. माणिकराव कोकाटे यांनी कामकाजाला सुरुवात केली; मात्र त्यांच्या जिल्ह्यात त्यांना कार्यालय उपलब्ध नव्हते. अखेर मंत्री कोकाटे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील उंटवाडी येथील कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे विभागीय संपर्क कार्यालय सुरू झाले आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Nashik News : नाशिक : कृषिमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अॅड. माणिकराव कोकाटे यांनी कामकाजाला सुरुवात केली; मात्र त्यांच्या जिल्ह्यात त्यांना कार्यालय उपलब्ध नव्हते. अखेर मंत्री कोकाटे यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरातील उंटवाडी येथील कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे विभागीय संपर्क कार्यालय सुरू झाले आहे.

या कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे आणि शासन सेवा अधिक सुलभ करणे हा उद्देश आहे. हे कार्यालय नाशिकच्या सर्वसामान्य जनतेसाठी एक मजबूत पाऊल ठरेल, असा विश्वास मंत्री कोकाटे यांनी व्यक्त केला.

कार्यालय उद्‍घाटन कार्यक्रमास कृषी आयुक्तालयाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, प्रकाश बनकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेचे (रामेती) प्राचार्य शिवाजी आमले, कृषिमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सचिन हिरे आदी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी विभागीय संपर्क कार्यालयामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याने समाधान व्यक्त केले.

लोकाभिमुख प्रशासन, जलद निर्णय आणि समृद्ध नाशिकसाठी नवा आयाम ठरेल. या कार्यालयामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होणार; थेट नाशिकमध्येच अडीअडचणी मांडता येतील. शेती, व्यापार, आदी क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी वेगवान निर्णय प्रक्रिया शक्य होईल.

शासकीय योजना, अनुदान, विविध विभागांची मदत आणि सुविधा यांची माहिती त्वरित उपलब्ध होईल. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक आणि नागरिकांना थेट संवादाची संधी मिळेल. हे कार्यालय नाशिकच्या सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी उभारलेले एक मजबूत पाऊल ठरणार असल्याचा मला विश्वास आहे, असे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Fertilizer Stock : देशात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा; शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही, केंद्र सरकारचा दावा

Agriculture Exports: कृषी व्यापार धोरण आणि निर्यातीतील कामकाज

Sugarcane Crushing Season: सहा कारखान्यांचा हंगाम आटोपला

LPG Gas Cylinder Price Hike: युद्धाची सर्वसामान्यांना झळ, घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला

Nathacha Ranjan Ritual: ‘नाथांचा रांजण’ भरण्याच्या पारंपरिक सोहळ्याला प्रारंभ

SCROLL FOR NEXT