Agriculture Minister Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate : पवार कुटुंबीयांचे कृषी क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे : कृषीमंत्री कोकाटे

Agricultural Contribution : कृषीमंत्री कोकाटे यांनी पवार कुटुंबाच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर महत्त्वपूर्ण भाष्य करत, त्यांच्या कार्याला सन्मान दिला. पवार कुटुंबाने कृषीवाढीमध्ये मोठे योगदान दिले असून, ते भारतीय कृषी क्षेत्राचे प्रगतीसाठी आदर्श बनले आहे.

Roshan Talape

Pune News : बारामतीत कृषिक 2025 कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पवार कुटुंबीयांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पवार कुटुंबीयांनी शेतीत मोठा बदल घडवून आणला आहे.

बारामती कृषी विज्ञान केंद्र ही भारतातील कृषी क्षेत्रात काम करणारी एक अग्रेसर संस्था आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी पवार कुटुंबीयांनी मोठे योगदान दिले आहे. येणाऱ्या काळात कृषी क्षेत्रात बदल झालेले पाहायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्यांनी शेती क्षेत्रातील गैरप्रकारांवर भाष्य करत बोगस पीकविमा प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होऊन सत्य समोर येईल, असेही स्पष्ट केले. विशेषतः बीड जिल्ह्यातील प्रकरणे सर्वाधिक असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत विधानसभेत चर्चा सुरू असून, चौकशी प्रक्रिया चालू असल्याची माहिती दिली.

तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी महत्त्वाचा

तसेच कृषी क्षेत्रातील बदलांवर भाष्य करत कोकाटे यांनी शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या बि-बियाणांचा वापर गरजेचा असल्याचे सांगितले. ड्रोनच्या मदतीने फवारणीस प्राधान्य देण्याची घोषणा त्यांनी या कार्यक्रमावेळी केली. तसेच, ‘अॅग्रीस्टॅक पोर्टल’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती मिळेल, ज्यामुळे शेतीविषयक धोरणे ठरविण्यासाठी फायदा होणार आहे असे त्यांनी नमूद केले.

बारामती कृषी विज्ञान केंद्राचा महत्वाचा वाटा

पवार कुटुंबीयांनी शेतकरी आणि शेतीसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत, कोकाटे म्हणाले, बारामती कृषी विज्ञान केंद्र आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून संशोधन व तंत्रज्ञान गावागावांपर्यंत पोहोचवले जात आहे, ज्यामुळे शेतीतील प्रगतीला गती मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT