Agriculture Minister Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Minister Kokate : योजनेतील गैरव्यवहार वक्तव्याचा विपर्यास केला; कृषिमंत्री कोकाटे मिडियावर संतापले

Crop Insurance Maharashtra : एखाद्या योजनेत गैरव्यवहार होतात, या वक्तव्यावरून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधकांनी जोरदार टिका केली. राज्यभर त्यांचं वक्तव्य चर्चाचा विषय ठरलं. त्यामुळे कोकाटे यांनी आता स्पष्टीकरण देत माध्यमांवर संताप व्यक्त केला.

Dhananjay Sanap

Government Scheme : एखाद्या योजनेत गैरव्यवहार होतात, या वक्तव्यावरून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधकांनी जोरदार टिका केली. राज्यभर त्यांचं वक्तव्य चर्चाचा विषय ठरलं. त्यामुळे कोकाटे यांनी आता स्पष्टीकरण देत माध्यमांवर संताप व्यक्त केला. मी गैरव्यवहार होत असल्याचं म्हणालो, पण मीडियाने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मला मीडियाशी बोलायचं नाही, असा संताप कोकाटे यांनी व्यक्त केला.

कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, "मी म्हणालो एखाद्या योजनेत गैरव्यवहार होत असतात. पण मीडियाने त्या वक्तव्याचा विपर्यास केला. गैरव्यवहाराच्या जागी भ्रष्टाचार शब्द टाकला आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्या बातम्या चालवल्या." असं म्हणत कोकाटे यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात एक रुपया पीकविमा योजनेतील भ्रष्टाचारावरून राजकारण तापलं आहे. या योजनेतून शेतकऱ्यांऐवजी सीएससी सेंटरची उखळ पांढरी केली गेली, असा आरोप झाला. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बीड जिल्ह्यात १ लाख बोगस पीक विमा प्रकरण घडल्याचा आरोप केला. तसेच पीक विम्याचा बीड पॅटर्न असं म्हणत सरकारवर टिका केली.

विरोधकांच्या आरोपावर उत्तर देताना राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी कोणत्याही योजनेत दोन चार टक्के गैरव्यवहार होतात, असं वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे कोकाटे यांना भ्रष्टाचाराचं गांभीर्य नसून ते समर्थन करत आहेत, अशी टिका विरोधकांनी केली. त्यामुळे कोकाटे यांनी माध्यमांवर संताप व्यक्त केला.

दरम्यान, एक रुपया पीकविमा योजनेत ३५० कोटींचा आरोप झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्या सीएससी सेंटरवर कारवाई करण्यात आल्याचं कृषिमंत्र्यांनी सांगितलं. पकविम्यातील बोगस प्रकरण आणि घोटाळ्यामुळे एक रुपयात पीक विमा योजना बंद करावी, अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केली आहे. त्यामुळे पीक विम्यावरून रान तापलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसाला आधार, आल्याचे भाव टिकून, मक्याची आवक स्थिर, भेंडीची आवक स्थिर

Weather Update: २८ जिल्ह्यात पावसाचा इशारा; तर तुरळक ठिकाणी गारपीटीची अंदाज

Crop Damage Compensation: कीड-रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? कृषिमंत्र्यांचा मोठा खुलासा

Labor Shortage: उष्णतेने मजूरटंचाई खानदेशात वाढली

Tapi Irrigation Project Issue: पाडळसे निम्न तापी सिंचन प्रकल्प रखडलेलाच

SCROLL FOR NEXT