Agriculture Minister Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : अधिकाऱ्यांच्या पदनाम बदलाच्या मागणीस कृषिमंत्र्यांचा दुजोरा

Agriculture Minister Dhananjay Munde : राज्यात कार्यरत असलेल्या कृषी सहायकांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी तर कृषी पर्यवेक्षकांचे सहकृषी अधिकारी असे पदनाम करण्यात यावे .या बदलाबाबतच्या मागणीस श्री. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Team Agrowon

Akola News : राज्यात कार्यरत असलेल्या कृषी सहायकांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी तर कृषी पर्यवेक्षकांचे सहकृषी अधिकारी असे पदनाम करण्यात यावे, अशी मागणी कृषी सहायक व पर्यवेक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. या बदलाबाबतच्या मागणीस श्री. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

गुरुवारी (ता.३) कृषी सहायक व पर्यवेक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली.

राज्यात नुकतेच ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पदनाम बदलण्यास राज्य शासनाने मंजूर केले आहे. याबाबतचा शासनादेश जारी झाला आहे. त्यामुळे प्रलंबित असलेली कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक पदनाम बदलाच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली.

राज्यभरात ही पदनामे बदलण्याची मागणी केली जाऊ लागली. याबाबत कृषी सहायक व पर्यवेक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडे यांची भेट घेत मागण्यांबाबत माहिती दिली. ही पदनामे बदलण्याने कुठलाही आर्थिक भार वाढणार नसल्याचेही निदर्शनात आणून देण्यात आले.

कृषिमंत्री मुंडे यांनी ही दोन्ही पदनामे बदलण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले, अशी माहिती कृषी सहायक संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप केवटे यांनी दिली. लवकरच याबाबत निर्णय होईल, असेही मंत्र्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT