Wild Buffalo Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : पाचलमधील शेतीला गवारेड्यांचा त्रास

Crop Damage : गेल्या काही महिन्यांपासून पाचल परिसरात मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्याने दहशत पसरवलेली असतानाच सध्या गवारेड्यांचा त्रास वाढला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : गेल्या काही महिन्यांपासून पाचल परिसरात मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्याने दहशत पसरवलेली असतानाच सध्या गवारेड्यांचा त्रास वाढला आहे. पाचल परिसरातील परूळे येथील शेतकरी मनोहर सावंत यांच्या बागेतील सुमारे पन्नासहून अधिक फळधारणा झालेल्या काजूची झाडे मोडून गवारेड्यांनी नुकसान केले. सावंत यांना काजूच्या ऐन हंगामात हातातोंडाशी आलेले काजूचे पीक गेल्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

घाट परिसरातील जंगलात वावरणाऱ्या गव्यांचा तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षापासून वावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. परुळे येथील शेतकरी सावंत यांच्या बागेतील सुमारे पन्नासहून अधिक काजूच्या फळधारणा झालेल्या झाडांची गवारेड्यांच्या कळपाने मोडतोड केली. सध्या काजू हंगाम सुरू झाला आहे.

ओल्या काजुगरासह सुक्या बियांनाही चांगला दर मिळत असतानाच लागलेल्या काजू कलमांची गवारेड्यांनी नासधूस केल्याने सावंत यांचे मोठे नुकसान झाले आहे. लहरी आणि अनियमित पाऊस, मजुरांची वानवा, खर्च अन् उत्पन्नाचा न बसणारा मेळ आदी विविध कारणांमुळे शेती धोक्यात आली आहे.

वारंवार बदलणाऱ्या हवामानाचाही आंबा-काजू बागावरही परिणाम होत आहे. त्यामुळे चिंतातूर असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये गव्यांच्या उच्छादाने भर घातली आहे. गव्यांकडून होणाऱ्या त्रासाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

गेल्या काही वर्षापासून राजापूर तालुक्यामध्ये गव्यांचा वावर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये विविध भागांसह शेतशिवार, आंबा-काजूच्या बागा आणि अन्य परिसरामध्ये दिवसा-रात्री गवे आढळून येतात. तालुक्यामध्ये सुमारे दहा-पंधरा गवारेड्यांचे कळप आणि सुमारे शंभरहून अधिक गवे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI In Agriculture: ऊस शेतीत एआयच्या वापरासाठी इस्माचा एडीटीसोबत करार

Agriculture Technology: हवारहित स्थितीमध्ये वाळवणाचे तंत्र

Cotton Farming Technology: कापूस तंत्रज्ञान प्रकल्पातून शेतकरी झाले जागरूक

Indian Chess Champion: बुद्धिबळातील सुवर्णकन्या!

US Import Tarrif: आयातीचा उंट तंबूत नको

SCROLL FOR NEXT