Agricultural Pump
Agricultural Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : ऐन हंगामात शेतीचे रोहित्र बंद

Team Agrowon

Agriculture Electricity म्हसदी, जि.धुळे : म्हसदीसह साक्री तालुक्यात विविध गावांत वीज बिल थकल्याने रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) (Transformer) बंद करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंत्यांची भेट घेत संताप व्यक्त केला.

शेती पंपासाठी (Agricultural Pump) वीज पुरवठा (Electricity Supply) दिल्या जाणाऱ्या वेळेत सतत लपंडाव सुरू असल्याची तक्रार करण्यात आली.

ऐन हंगामात वीज पुरवठा खंडित दरम्यान, रब्बी हंगाम काढणी आणि उन्हाळ कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तथापि सर्वच पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असताना वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या‌ हातात तोंडाशी आलेला घास असताना वीज बिल थकल्याचे कारण सांगून रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

विजेच्या थकीत बिलापैकी किमान वीस टक्के वीज बिल भरल्या शिवाय रोहित्रे सुरू होणार नाहीत. असा इशारा कनिष्ठ अभियंता व वीज कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

तसेच, वीज बिल भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला जात असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांसह राजधर देसले, लहू नेरे, शरद साळुंखे, श्रीराम नेरे उपस्थित होते.

पाच वर्षांपासून शेती पंप थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिल भरले नाहीत. त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. सदर थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिल भरून महावितरणास सहकार्य करावे.
योगेश खैरनार, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, म्हसदी (ता. साक्री, जि. धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT