Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Kokan Agriculture: कोकण विभागासाठी खरीप भात, हापूस आंबा, नारळ आणि काजू लागवडीसाठी सल्ला दिला आहे. योग्य जमिनीसाठी नांगरट, खत व्यवस्थापन आणि पाणी देण्याच्या पद्धतींवर भर दिला आहे.

Team Agrowon

Agriculture Tips:

खरीप भात

रोपवाटिका पूर्वतयारी

खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू द्यावी. यामुळे तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल.खरीप भात लागवड लागवड नियोजनानुसार आवश्यक तितक्या भात बियाण्यांची तसेच रासायनिक खतांची उपलब्धता करून घ्यावी.

जाड दाण्याच्या जातीसाठी प्रति १० गुंठा ५ ते ६ किलो, बारीक दाण्याच्या जातीसाठी प्रति १० गुंठा ३.५ ते ४ किलो आणि संकरित जातीसाठी प्रति १० गुंठा २ किलो बियाणे वापरावे. भाताची लागवड रहू पद्धतीने करावयाची असल्यास बारीक दाण्यांच्या जातीसाठी ३ ते ३.५ किलो आणि जाड दाण्यांच्या जातीसाठी ४ किलो बियाणे प्रति एकरी पुरेसे होते.

हापूस आंबा

नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे.

नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफ सफाई करून घ्यावी.लागवड १० × १० मीटर अंतरावर व घन पद्धतीने लागवड करणार असाल तर ५ × ५ मीटर अंतरावर १ × १ × १ मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. त्यात सुपीक माती, तीन ते चार घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण भरून ठेवावे.वाळवी नियंत्रणासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची भुकटी खड्ड्यात टाकावी.

नारळ

नवीन लागवड नारळ लागवडीसाठी ७.५ बाय ७.५ मी. अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. तयार खड्ड्यांमध्ये ३ ते ४ घमेली चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट आणि सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो या मिश्रणाने भरून घ्यावेत.

काजू

काजू नवीन लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील साफसफाई करून घ्यावी.लागवडीसाठी ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावर खड्डे खोदावेत. खड्ड्यांची लांबी, रुंदी, खोली ०.६x०.६x०.६ मीटर इतकी असावी. या प्रमाणे हेक्टरी १५५ ते २०० कलमे बसतात. खड्ड्यात दीड ते दोन घमेली चांगले कुजलेले कंपोस्ट, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळावी. वाळवी नियंत्रणासाठी शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची भुकटी खड्ड्यात टाकावी.

८१४९४६७४०१

dpl.amfu@gmail.com

(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT