Yogesh Shivram Sonawane Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Officer Suicide: कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायकाची आत्महत्या

Workplace Harassment Case: सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीच्या तक्रारीनुसार, आत्महत्येसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

कार्यालयात कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. योगेश शिवराम सोनवणे (वय.४०, रा.वाल्मीकनगर, जळगाव, मु. पो. शिवाजीनगर, सिल्लोड) असे आत्महत्या केलेल्या कृषी सहायकाचे नाव आहे.

घडलेल्या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात पतीस मानसिक त्रास व अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून तालुका कृषी अधिकारी व एका कृषी सहायकावर सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांचे पती योगेश सोनवणे हे सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असून, त्यांना तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर श्यामलाल बरदे व कृषी सहायक किशोर उत्तमराव बोराडे यांनी मानसिक त्रास दिला. तसेच कर्तव्यावर असताना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे तसेच सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त काम लावल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केले. या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची फिर्याद देण्यात आली आहे.

फिर्यादीवरून संशयित आरोपी तालुका कृषी अधिकारी, ज्ञानेश्‍वर श्यामलाल बरधे व कृषी सहायक किशोर उत्तमराव बोराडे (दोघे रा. सिल्लोड) यांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.२०) गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी. आर. कायंदे करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT