Hirda Crop  Agriuclture
ॲग्रो विशेष

Hirda Crop : हिरडा नुकसान भरपाईसाठीचा लढा पुन्हा सुरू

Crop Damage : निसर्ग चक्रीवादळामुळे जून २०२० साली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील, आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हिरड्यांचे मोठे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Pune News : निसर्ग चक्रीवादळामुळे जून २०२० साली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील, आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हिरड्यांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर पंचनामे झाले होते, परंतु अद्याप नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही.

शासन निर्णय होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नाहीत. आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील सुमारे ४० पेक्षा अधिक गावांतील नागरिक भरपाई मिळेपर्यंत संविधानिक मार्गाने लढण्याचा निर्धार केला आहे.

हिरडा नुकसान भरपाई न मिळाल्याने किसान सभेचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन जनजागृती करत आहे. नुकतेच आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील ४० गावांत प्रतिज्ञा व जनजागृती करण्यात आली. तर शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास, ऐन श्रावण महिन्यात, तीव्र आंदोलनास सुरुवात होईल असा निर्धार या प्रतिज्ञेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

फेब्रुवारी- २०२४ मध्ये, सात दिवसांचे उपोषण मंचर प्रांत कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने करण्यात आले होते. या दरम्यान गावागावांत सुद्धा आंदोलने झाली होती. याची दखल घेत राज्य शासनाने १२ मार्च २०२४ रोजी, हिरडा नुकसान भरपाई देण्याविषयी शासन निर्णय काढला आहे.

परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, तमाम हिरडा उत्पादक शेतकरी बांधवांना, व्यक्तिगत वा सामूहिक निर्धार प्रतिज्ञा घेऊन १२ मार्च, २०२४ रोजी शासनाने काढलेल्या निर्णयाचे जाहीर वाचन किसान सभेच्या वतीने करण्यात आले.

जांभोरी, पोखरी, चिखली, फलोदे, कोंढवळ, तेरुंगन, म्हातारबाचीवाडी, गोहे खुर्द , पाटण, पिंपरी, कोंढवळ, कुशिरे बुद्रुक, कुशिरे, भोईरवाडी, आघाने, नव्हेड, म्हाळुंगे, बोरघर, माळीण, आडविरे, असाने, घोडेगाव, निगडाळे, आहुपे, पिंपरगणे, अजनावले, तळेचीवाडी, घाटघर, फांगुळ गव्हाण, खडकुंबे, उसरान या गावांत शेतकऱ्यांनी निर्धार प्रतिज्ञा घेतली.

किसान सभेची ही निर्धार प्रतिज्ञा गावोगावी लोकांनी घेण्यासाठी, डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, कृष्णा वडेकर, लक्ष्मण जोशी, अशोक जोशी, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, कोंडीभाऊ बांबळे, संदीप शेळके, बाळू कोंढवळे, कावजी तिटकारे, अशोक पारधी, चिंतामण लांघी, नारायण वायाळ यांनी सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT