Milk Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात आंदोलने

Milk Rate Protest : दूध दरासाठी आमरण उपोषण सुरू असताना गुरुवारी (ता. ७) सायंकाळी आणि रात्री सोनाई दूध संघाचे दुधाने भरलेले टँकर अडवून त्यांच्यावर दगडफेक केली.

Team Agrowon

Pune News : येथे दूध दरासाठी आमरण उपोषण सुरू असताना गुरुवारी (ता. ७) सायंकाळी आणि रात्री सोनाई दूध संघाचे दुधाने भरलेले टँकर अडवून त्यांच्यावर दगडफेक केली. तसेच चालकाला दमदाटी व मारहाण करून चावी काढून घेत सीलबंद असलेले दूध रस्त्यावर सोडून देण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात १२ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत किरण सुखदेव मोरे (रा. बावडा, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इंदापूर शहराच्या हद्दीतील पुणे- सोलापूर मार्गावरील अकलूज पुलाजवळील सेवा रस्त्यावर दुधाने भरलेला सोनाई डेअरीचा टँकर (क्र.एमएच ४२ टी ४१००) हा दूध घेऊन जात असताना अचानक २२ ते २४ वयोगटातील सहा ते सात युवकांनी तोंडाला रुमाल बांधून टॅंकरच्या केबिनमध्ये घुसून बळजबरीने चावी काढून हाताने मारहाण करून फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील पाचशे रुपयेही काढून घेतले.

तसेच टँकरच्या पाठीमागे जात टॅंकरचे सील तोडून त्यातील पाच ते सहा हजार लिटर दूध खाली सोडून दिले. यात डेअरीचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तर चालक शरद बबन घाडगे (रा. चांडगाव, ता. इंदापूर) हे घेऊन चाललेल्या टँकर हा देखील भाटनिमगाव ते काळेवाडी नंबर एक येथील दूध भरून घेऊन चाललेल्या टँकरला पुणे-सोलापूर महामार्गावरती राजवडी पुलचढत असताना मोटर सायकल आडव्या मारुन दुधाचे सीलबंद वाल तोडून सात हजार लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले.

यामध्ये १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमूद केले आहे. या बाबत बोलताना पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT