Grape Pruning Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pruning : सांगली जिल्ह्यातील आगाप द्राक्ष फळ छाटणी लांबणीवर

Grape Management : फळ छाटणीसाठी राज्यासह परराज्यातून मजूरही दाखल झाले आहेत. मात्र, यंदा जून आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा पूर्व भाग, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही भागात द्राक्षाची आगाप फळ छाटणी ऑगस्टच्या मध्यापासून सुरु होते. फळ छाटणीसाठी राज्यासह परराज्यातून मजूरही दाखल झाले आहेत. मात्र, यंदा जून आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस आहे. या पावसामुळे द्राक्षाची आगाप फळ छाटणी लांबणीवर पडली आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी १ लाख ५० हजार एकरांवर क्षेत्र आहे. मिरज तालुक्याचा पूर्व भाग, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावात ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून शेतकरी फळ छाटणी घेतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काही प्रमाणात फळ छाटणीस प्रारंभ होतो.

त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोंबर या दोन महिन्यांत जिल्ह्यातील द्राक्षाची फळ छाटणी पूर्ण होते. या दरम्यान, फळ छाटणी घेतलेली द्राक्ष डिसेंबर मध्ये विक्रीला येतात. यावेळी द्राक्षाला अपेक्षित दर मिळतो. त्यामुळे शेतकरी जूलै महिन्यापासून आगाप फळ छाटणीचे नियोजन करतात. मात्र, गतवर्षी पावसाने मारल्याने आगाप फळ छाटणी उशिरा सुरु झाली होती. त्यानंतर फुलोरावस्थेत असताना पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्षाचे नुकसान झाले होते.

यंदा जून महिन्यापासून पावसाचा सुरवात झाली. जून महिन्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे नियोजन सुरु केले. जिल्ह्यात परराज्यातून द्राक्ष बागेत काम करण्यासाठी मजूरही दाखल होतात. मात्र, जुलैच्या मध्यापासून पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झाली.

त्यामुळे मजूर दाखल झाले नाहीत. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसात पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. ऑगस्टच्या मध्यापासून आगाप फळ छाटणीस सुरवात होते, त्यामुळे परराज्यातील मजूर जिल्ह्यात दाखल झाले. शेतकऱ्यांनी पुन्हा द्राक्षाची आगाप फळ छाटणीचे नियोजन केले.

मात्र, विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. जिल्ह्यात सर्व दूर सलग पाऊस सुरु होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अति पावसामुळे ओलांडल्यावर मुळ्या फुटल्या आहेत. बागांत पाणी साचले आहे. त्यामुळे फळ छाटणी अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी द्राक्षाची आगाप फळ छाटणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून एकाच वेळी फळ छाटणी सुरु होण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस झाल्याने समाधान आहे. परंतु शेतात पाणी साचल्याने बागेतील कामे अपूर्ण आहेत. त्यातच आगाप द्राक्षाची फळ छाटणीही लांबणीवर पडली आहे. आता सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष छाटणी सुरु होईल.
- संजय बरगाले, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मालगाव, ता. मिरज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT