Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रानं तयार झाली, पण ओलच नाही..!

Team Agrowon

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीनंतर रानं तयार केली. बी-खतांची तपवीज केली. परंतु जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी करता आली नाही. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर दिवाळीतही पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी नांदेड जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर आहे. तर कृषी विभागाने रब्बीसाठी केलेल्या नियोजनात वाढ करून चार लाख हेक्टरवर रब्बीत पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त करून बियाणे तसेच खताची मागणी केली होती. हरभराचे क्षेत्र पावणेतीन लाख हेक्टर गृहीत धरले होते.

परंतु यंदा सप्टेंबरच्या पंधरा तारखेनंतर पावसाने उघडीप दिली. यानंतरही परतीच्या पावसाने हजेरी लावली नाही. ऑक्टोबरमध्ये पडलेल्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा नाहीसा झाला. खरिपातील पिकांच्यास काढणीनंतर यात अधिक भर पडून जमिन कोरडी पडली. शेतकऱ्यांनी मात्र दिवाळीत पाऊस पडेल या अशेवर जमिनी तयार करण्याचे काम सुरू ठेवले.

दिवाळीपूर्वी काही दिवस ढगाळ वातावरणही तयार झाले. परंतु पावसाने मात्र हजेरी लावली नाही. या काळात काही शेतकऱ्यांनी पेरलेला हरभरा, रब्बी ज्वारी, करडई या सारखी पिकेही उगवली नाहीत. यामुळे इतर शेतकरी सावध होत पावसानंतरच पेरणी करू अशा मानसिकतेत आहेत. तर काही पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी देऊन पेरणी केली. पिकांची उगवणही चांगली झाली. परंतु पाणी किती दिवस पुरणार या चिंतेत ते असल्याचे दिसून येत आहे. तसेच ज्या भागात प्रकल्पाचे पाणी मिळते त्या भागातील शेतकरी हरभऱ्याऐवजी ज्वारीची पिके घेऊन चाऱ्याची व्यवस्था करण्याच्या मानसिकतेत आहेत.

चार लाख हेक्टर प्रस्तावित

जिल्ह्यात यंदाच्या वर्षी चार लाख हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, रब्बी मका, हरभरा, करडई, रब्बी तीळ, रब्बी सूर्यफूल, जवस, मोहरी या पिकांचा समावेश आहे. आजपर्यंत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३१.३० टक्के नुसार ७० हजार ३१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक ६४ हजार ४९४ हेक्टरवर हरभरा, तीन हजार ४२० हेक्टरवर रब्बी ज्वारी, एक हजार ६४८ हेक्टरवर गहू, दोनशे हेक्टरवर मका, ५०३ हेक्टरवर करडई या पिकांची पेरणी झाली आहे.

दरवर्षी २० एकरात हरभरा पेरणी होतो. यंदाही जमिनी तयार केल्या, परंतु मागील दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे ओल नाही, यामुळें रब्बीत पेरणी करता आली नाही. -
उत्तम मोरे, शेतकरी, देगाव, ता. नायगाव, जि. नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT