Road problem Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पावसाच्या आगमनानंतर रस्त्यांची दैना

Team Agrowon

Monsoon Rain : बोर्डी : तलासरी तालुक्यातील झाई-बोरीगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील पश्चिम रेल्वेवरील बोर्डी रोड रेल्वे स्थानकापासून झाई पोलिस चौकीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चालकांसह वाटसरूंना तारेवरची कसरत करून या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

मागील चार वर्षांपासून बोर्डी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फ्रेट कॉरिडॉरच्या उड्डाणपुलाचे काम चालू आहे. याकरिता बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

मात्र सार्वजनिक बांधकाम खाते, याकडे डोळेझाक करत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. २०२२ च्या पावसाळ्यात स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली.

तसेच मे २०२३ पर्यंत या कामाची पूर्णतः करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतर वर्षभर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत.

झाई येथून पश्चिम रेल्वेच्या पूर्वेकडे तलासरी तालुक्याचे ठिकाण आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा हा सीमेवरील मुख्य रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते; परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळे आहेत.

बोर्डी रोड रेल्वे स्थानकापासून झाई पोलिस चौकीपर्यंत रस्त्याची झालेली दुरवस्था स्थानिकांसाठी डोकेदुखी झाली आहे. मागील वर्षी स्थानिकांनी संयम राखून, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत सहकार्य केले होते; मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांकडे दुर्लक्ष केले आहे.
तुषार मोरे, वाहनचालक
बोर्डी रोड रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्याचे काम पावसामुळे कंत्राटदाराने बंद केले. पावसाने उघडीप दिल्यास लगेच कामाला सुरुवात करण्यात येईल.
एस. डी. पावरा, अभियंता, तलासरी शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

Sugar Industry : भारत-ब्राझीलमधील साखर उद्योगाचा गोडवा वाढला

Food Industry Development: सरकारकडून अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक सुधारणा

Monsoon 2024 : मॉन्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय

Maharashtra Rain : विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT