Manual Paddy Transplanter  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : हातचलित यंत्राने भातलावणी सुखकर

Paddy Farming : पालघर जिल्ह्यात मागील वर्षी २४ हेक्टरने वाढ होऊन ७६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भातलावणी करण्यात आली होती.

Team Agrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यात मागील वर्षी २४ हेक्टरने वाढ होऊन ७६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भातलावणी करण्यात आली होती. यंत्राच्या किमती महागड्या असल्याने सामान्य शेतकऱ्याला यंत्राच्या साह्याने भातलावणी करणे परवडण्यासारखे नाही.

त्यामुळे डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने कमी किमतीत शेतकऱ्यांसाठी हाताने चालविण्याचे भातलावणीचे यंत्र विकसित केले आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये हे हातचलित यंत्र फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे यंत्र खरेदी करावे, असे पालघर उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी आवाहन केले.

खरीप हंगामात भातलावणी करणे सोपे व सोईस्कर होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कोकण कृषी विद्यापीठाने निर्मिती केलेल्या हातचलित भातलावणी यंत्राचा वापर करून शेतकऱ्यांना भातलावणी खर्चिक आणि कंटाळवाणी वाटणार नाही, असेही बर्वे यांनी सांगितले.

वाकून हाताने रोपलावणी करणेही खूप त्रासाचे, वेळ घेणारे आणि खर्चिक असल्याने हातचलित यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. वाकून भातलावणी केल्याने होणारा शारीरिक तास या यंत्राच्या वापराने कमी होतो.

१८ हजार १५० रुपयांचा खर्च

ट्रे पद्धतीने रोपे बनवून लावणी करण्यात येणाऱ्या यंत्राची किंमत ही साधारणतः दोन ते तीन लाख रुपये आहे. हे यंत्र खरेदी करणे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्याऐवजी या गरीब शेतकऱ्यांना परवडेल, या हेतूने कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने १८ हजार १५० रुपये किमतीचे हातचलित भातलावणी यंत्र नव्याने विकसित केले आहे, असे उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT