Minister Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Devendra Fadnavis : सामान्यांना परवडणारी आरोग्य व्यवस्था

Team Agrowon

Nagpur News : महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर दोनच महिन्यांत ३१७ दवाखाने सोमवारी (ता. १) राज्यभरात सुरू करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात १२ दवाखाने सुरू झाले आहेत.

सर्वसामान्य माणसाला आरोग्याविषयक खर्चाचा ताण पडू नये, अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीने मुंबईवरून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

संपूर्ण राज्यात ३१७ ठिकाणी हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला असून नागपूर जिल्ह्यातील १२ ठिकाणांचा यात समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातून या कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी उपस्थिती होती. उस्मानाबादहून आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उपस्थित होते.

‘आपला दवाखाना’ हा लोकाभिमुख उपक्रम आहे. या माध्यमातून ३० विविध सेवा निःशुल्क देण्यात येणार आहेत. या दवाखान्यांमध्ये विविध तज्ज्ञांना बोलवून एक्सपर्ट कन्सल्टेशनदेखील निःशुल्क मिळणार आहे.

निःशुल्क तपासणी, उपचार आणि औषधे

आपला दवाखान्यामध्ये मोफत उपचार, तपासणी आणि औषधे देण्यात येणार आहेत. दवाखान्यात सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाह्यरुग्णसेवेची वेळ दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असणार आहे. बाह्यरुग्ण सेवा, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवतींची तपासणी लसीकरण या सुविधा प्रामुख्याने पुरविण्यात येणार आहेत.

गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ज्ञ सेवा

गरजेनुसार सात प्रकारच्या तज्ज्ञ सेवा या दवाखान्यात पुरविण्यात येणार आहेत. यात फिजिशियन स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग, मानसोपचार, नाक कान घसा तज्ज्ञ यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

पुरेसे मनुष्यबळ असणार उपलब्ध

दवाखान्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT