Milk Adulteration  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Adulteration : दुधात भेसळ आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई

Milk Production : शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ व गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत, यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Parbhani News : दूध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी. दूध भेसळ प्रकरणी दोषींवर होणार कठोर कारवाई करू. भेसळ रोखण्यासाठी नागरिकांना पुढे यावे लागेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले.

जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ व गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी (ता .२६) समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आगामी गुढीपाडवा आणि रमजान ईद सणांच्या पार्श्‍वभूमीवर या पदार्थांची मागणी वाढत असल्याने जिल्हाभर विशेष तपासणीसाठी धडक मोहीम राबवण्याचे निर्देश डॉ. काळे यांनी या वेळी दिले. दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मिठाई विक्रेत्यांची तपासणी करून नमुने घेण्याचा निर्णय झाला आहे.

विशेषतः चीज अनॉलॉग या पनीर सदृष्य पदार्थांची विक्री पनीर म्हणून करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. अशा विक्रेत्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनाप्रमाणे मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ व गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत, यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी स्थापन जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीमार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात भेसळ रोखण्यासाठी दूध उत्पादक, संकलन केंद्रे व वितरक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या लस्सी, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांची तपासणी होणार असून भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास नागरिकांनी (९९२३६८९१६८, ९०४९५१८७११) तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT