Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Aadsali Sugarcane Production : ‘आडसाली’ने आडवली ‘सुरू’, ‘पूर्वहंगामी’ची वाट

Sugarcane Cultivation : ऊस लवकर जावा, म्हणून शेतकरी आडसाली लागवडीकडे मोठ्याप्रमाणात वळले आहेत. त्यामुळे आडसालीचे वाढलेले क्षेत्र लक्षात घेता तोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे.

Team Agrowon

Satara News : ऊस लवकर जावा, म्हणून शेतकरी आडसाली लागवडीकडे मोठ्याप्रमाणात वळले आहेत. त्यामुळे आडसालीचे वाढलेले क्षेत्र लक्षात घेता तोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे.

परिणामी सुरू, पूर्वहंगामी व खोडव्याला उशीर होत असल्याने याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. हा ऊस कधी तुटणार असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. आगामी काळात कारखान्यांनी ऊस लागवडीचे नियोजन करून अजिंक्यतारा कारखान्याप्रमाणे प्रोत्साहन योजना जाहीर करणे आवश्यक आहे.

या वर्षी अल्प पावसामुळे ऊस क्षेत्रावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४० हजार हेक्टरवर आडसाली ऊस असून तो सध्या तोडणीस आलेला आहे. तर सुरू, पूर्वहंगामी व खोडवा ऊस ४५ हजार हेक्टरवर आहे. केवळ ऊस लवकर जावा म्हणून शेतकऱ्यांचा आडसालीकडे कल वाढला आहे.

अडसाली जूनमध्ये लागवड असल्याने त्याला सर्वात प्रथम तोड येते. त्यामुळे पूर्व व सुरू हंगामी उसाला तोड येण्यात उशीर होत आहे. अडसालीचा ऊस तुटायला २० महिने लागत आहे. एकाच वेळेला या उसाची लागवड होत असल्याने सगळा ऊस एकाच वेळी तोडणीस येत असून त्याचा तोडणी वाहतूक यंत्रणेवर ताण येत आहे.

त्यामुळे तोडणी वाहतूक यंत्रा विस्कळीत झाली आहे. सध्या जानेवारी महिना संपत आला तरी अडसाली तोडण्या सुरू आहेत. त्यामुळे सुरू, पूर्व हंगामी उस कधी तुटणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे.

... तरच शेतकऱ्यांना फायदा

यासाठी कारखान्यांनी उस लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांना दिले पाहिजे. तसेच उशीर तुटणाऱ्या उसाला प्रोत्साहन योजना जाहीर करायला हवी. याबाबत अतिंक्यतारा साखर कारखान्याने निडवा उस ठेवणाऱ्यांना पुढील वर्षी प्रतिटन शंभर रुपये जादा दर देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे इतर कारखान्यांनीही उशिरा तुटणाऱ्या खोडवा, निडवा उसाला प्रोत्साहन योजना जाहीर करायला हवी तरच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT