Orange Cultivation
Orange Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Cultivation : तंत्रज्ञान अंगीकारून मृग बहर नियोजन करा

Team Agrowon

Washim News : उत्पादन घेताना विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून मृग बहाराचे नियोजन करावे. उत्पादन वाढीसोबतच उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करून त्याचे स्वतः विपणन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले.

जिल्ह्यातील मंगरूळपीर, मानोरा, रिसोड या भागांत संत्रा लागवड व उत्पादन घेतले जात आहे. संत्रा फळबाग घन लागवड, मृग बहार नियोजन, छाटणी, गुणवत्ता पूर्ण फळ उत्पादन याची शास्त्रीय माहिती होण्यासाठी कृषी विद्यापीठाचा फळशास्त्र विभाग, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), करडा कृषी विज्ञान केंद्र, मानोरा कृषी विभाग, मा. सु. पा. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मानोरा येथे मृगबहार संत्रा फळ पीक नियोजन कार्यशाळा व प्रक्षत्र भेट आयोजित करण्यात आली होती.

मानोरा येथे जवळपास १६५० एकर क्षेत्रावर संत्रा पिकाची लागवड झाली आहे. मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील संत्रा उत्पादक मृग बहार घेत असून त्यांना खर्च वजा जाता आर्थिक उत्पन्न चांगले मिळत आहे.

मात्र लागवडीनंतर बहार नियोजन, बदलत्या हवामानात बहाराचे नियोजन, अन्न द्रव्ये कमतरता, कीड, डिंक्या व ग्रीनिंग अशा समस्या वाढत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी त्याचा प्रसार व्हावा यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कृषी विद्यापीठाचे फळ शास्त्र विभाग प्रमुख डॉ. शशांक भराड यांनी नवीन बाग लागवड करताना जमिनीचे पृथ:करण करणे अनिवार्य आहे तसेच विद्यापीठांमधील जातीवंत कलमा घेण्याबाबत प्रेरित केले. घन लागवड पद्धतीबाबत विस्तृत माहिती दिली.

डॉ. दिनेश पैठणकर यांनी सद्यःस्थितीत झालेल्या पावसाने ताणात असलेल्या बागीच्याचे कशा प्रकारे नियोजन करावे याबाबत सखोल माहिती दिली. सहयोगी प्रा. डॉ उज्ज्वल राऊत यांनी संत्रा छाटणी, फळांचा आकार, विरळणी बाबत माहिती दिली.

वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. योगेश इंगळे यांनी कीड रोग व्यवस्थापन करताना सामूहिक प्रयत्नांतून करणे गरजेचे आहे. तसेच डिंक्या रोग व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन बाबी सांगीतल्या.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी अपारंपारिक भागात संत्रा लागवड वाढत असल्याचे सांगत यामुळे समृध्दी येत असल्याचे म्हटले. केव्हीकेचे विषय विशेषतज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी फळबाग लागवड इंडो-इस्राईल तंत्राने घेतल्या जात आहे याचे समाधान व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT