Maratha Reservation Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षणासाठी प्रशासन सज्ज

Maratha Reservation Survey : राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे.

Team Agrowon

Nashik News : राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे.

त्याअनुषंगाने नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांनी विहित मुदतीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मराठा सर्वेक्षण मोबाइल ॲप प्रशिक्षण प्रसंगी उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे बोलत होते.

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार वैशाली आव्हाड यांच्यासह प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी दराडे या वेळी म्हणाले, की जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ हजार ६८२ प्रगणक व ४५४ पर्यवेक्षक अधिकारी, शहर (महानगरपालिका क्षेत्र) मध्ये २ हजार ५४६ प्रगणक व १५९ पर्यवेक्षक तर मालेगाव (महानगरपालिका क्षेत्र) साठी १ हजार १६९ प्रगणक व ८० पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत

देवळाली कँटोन्मेंटसाठी १३६ प्रगणक व ६ पर्यवेक्षक नियुक्त आहेत. नियुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. २३) सुरू होणाऱ्या सर्वेक्षण मोहिमेत आपले पूर्ण योगदान द्यावे, असे सूचित करून निश्चित जबाबदारी दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी नागरिकही पूर्णपणे सहकार्य करतील, असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला.

या सर्वेक्षणात अधिक अचूकता यावी यासाठी सविस्तर प्रश्न नमूद करण्यात आले आहेत. प्रगणक व पर्यवेक्षकांना नागरिकांनी सर्व सहकार्य करून आपली सविस्तर माहिती द्यावी, असे आवाहन जलज शर्मा यांनी केले.

असे आहे नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक

तालुका प्रगणक पर्यवेक्षक

नाशिक २५४ १८

इगतपुरी ३६९ २४

कळवण ४४५ २९

चांदवड ३३५ २१

त्र्यंबकेश्वर २८३ २१

दिंडोरी ५६५ ३८

देवळा २९३ २०

नांदगाव ५६३ ४४

निफाड़ ८४६ ५७

पेठ १०७ ८

बागलाण ७६५ ४९

मालेगाव ६७६ ४५

येवला ५६७ ४२

सिन्नर ४०३ २७

सुरगाणा २१० ११

कँटोन्मेंट बोर्ड नाशिक १३६ ६

नाशिक (महानगरपालिका क्षेत्र) २५४६ १५९

मालेगाव (महानगरपालिका क्षेत्र) ११६९ ८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

Maharashtra Corrupt Ministers: कलंकित, भ्रष्ट मंत्री, आमदारांची हकालपट्टी करा

Achalpur APMC Scam: अचलपूर समितीत कोट्यवधीचा बांधकाम घोटाळा

Cow Based Farming: देशात गौ आधारित कृषी पद्धतीला मिळावी चालना

Livestock Registration: ‘कृषी’ दर्जानंतर पशुपालकांच्या नोंदणीला मिळेना प्रतिसाद

SCROLL FOR NEXT