Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी पुरेसा निधी देणार

Ajit Pawar : कोल्हापुर जिल्ह्यातील विविध विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापुर जिल्ह्यातील विविध विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्ह्यातील विविध विकासकामांची आढावा बैठक घेण्यात आली.

या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करून घ्यावे लागणार असल्याने त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करा. दूधगंगा गळती प्रतिबंधात्मक कामाची व घटप्रभा मध्यम प्रकल्पाची निविदा देऊन पुढील कार्यवाही गतीने करा,

धामणी प्रकल्पातील गावांना सानुग्रह अनुदानासाठीच्या प्रस्तावाला शासन स्तरावरून मान्यता देण्यात येईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठीच्या आराखड्यास केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली असून जागतिक बँकेसमवेत सामंजस्य करार करण्याची कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT