Kangana Ranaut On Farmers Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Kangana Ranaut On Farmers Protest : आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला, बलात्कार झालेत, शेतकरी आंदोलनावरून खासदार कंगनाचे वादग्रस्त विधान

Kangana Ranaut On border of Delhi Farmers Protest : हरियानाच्या शंभू सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार कंगना राणौत हिने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून काँग्रेसने यावरून प्रतिक्रिया दिली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हमीभाव कायद्यासह इतर विविध मागण्यांवरून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलक शेतकरी १३ फेब्रुवारीपासून येथील शंभू आणि खनौरी सीमेवर बसले आहेत. याचदरम्यान भाजप नेत्या तथा हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदार संघाच्या विद्यमान खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिने वादग्रस्त विधान केलं आहे. कंगनाने, पहिल्या शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप करताना तेथे मोठा हिंसाचार झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून यावरून काँग्रेसने कठोर शब्दांमध्ये टीका करताना निषेध व्यक्त केला आहे.

कंगनाने दैनिक भास्कर या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी आंदोलनावर वक्तव्य केलं. यावेळी कंगनाने, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतली नसते तर आंदोलक शेतकऱ्यांनी काहीही केलं असतं. तेथे आंदोलनादरम्यान मोठं षडयंत्र रचलं जात होतं. पण सुदैवाने शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत होतं. नाहीतर पंजाबची स्थिती आज बांगलादेश सारखी पाहायला मिळाली असती. तर तशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी मोठी योजना आखली जात होती, असा आरोप कंगनाने केला आहे. तर त्यावेळी मोदींच्या सरकारने कृषी विधेयक मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला होता असा दावाही कंगनाने केला आहे. कंगनाच्या या विधानावरून आता काँग्रेसबरोबर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.

कंगनाने, दिल्लीच्या सीमेवर केलेल्या त्या आंदोलनात पंजाबचा बांगलादेश व्हायला वेळ लागला नसता. त्या आंदोलनात मृतदेह लटकत होते. महिलांवर बलात्कार होत होते, असा दावा केला आहे. तर मोदी सरकारने जर तीन कृषी कायदे मागे घेतले नसते तर आजही आंदोलक शेतकरी तिथे बसले असते. आताही शेतकरी तेथेच बसले आहेत. यामागे मोठी प्लॅनिंग आणि षड्यंत्र आहे. पण या षड्यंत्रात कधी शेतकरी होते असं तुम्हाला वाटतं का? नाही यामागे चीन, अमेरिकेसारख्या परकीय शक्ती येथे काम करत असल्याचं कंगनाने म्हटले आहे.

तर देश खड्ड्यात गेला तर शेतकरीही खड्ड्यात जातील याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. मात्र जेवढी यांची बुद्धी आहे तेवढ्याच त्यांच्या कुरापती आहेत, असा टोला देखील कंगनाने शेतकरी आंदोलनकर्त्यांना लगावला आहे.

काँग्रेसची टीका

कंगनाच्या या वक्तव्यानंतर देशभर संताप व्यक्त केला जात असतानाच यावरून काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी टीका केली आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी, भाजपाची खासदार अन्नदात्यांना बलात्कारी आणि हत्या करणारे म्हणत आहे. याबाबात भाजपलाही तसेच वाटतं का असा सवाल सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्रीय मंत्री रनवीत बिट्टू यांना टॅग करत केला आहे. तर कंगनाच्या या वक्तव्याचा भाजप आणि केंद्र सरकार विरोध करण्याची हिंमत दाखणार का? की फक्त सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे असं नाटक संसदेत करणार अशा खोचक विचारणा सुप्रिया श्रीनेत यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vegetable Solar Dryer: सौर ड्रायरचे प्रकार अन् क्षमता

Indian Politics: गोंधळलेले सरकार अन विरोधकही...

Maize Production: मका : समतोल धोरण हवे

Purandar Airport: हरकती घेतल्यानंतरही विमानतळासाठी जमिनी का घेता?

Chakan Market: चाकण बाजारामध्ये काशीफळाच्या मागणीत वाढ

SCROLL FOR NEXT