Agriculture Input Center
Agriculture Input Center Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Center : बार्शी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

Team Agrowon

Barshi News : बार्शी शहर अन् तालुक्यात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भरारी पथकाने नुकत्याच केलेल्या कारवाईमध्ये पाच कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच एक केंद्र सील केले व दोन दुकानांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी दिली.

बार्शी शहर अन् तालुक्यात २९० कृषी सेवा केंद्रे असून त्यापैकी परवान्यामध्ये नमूद ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालू नाहीत किंवा बंद आहेत असे ५५ कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यांवर कार्यवाही करावी तसेच पाच कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांनी दिल्याचे तालुका कृषी अधिकारी कोयले यांनी सांगितले .

कायमस्वरूपी बंद असल्याने दोन कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. विहित मुदतीत परवाना नूतनीकरण न करणे, सर्व बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी बिले नसणे, उगम प्रमाणपत्र नसणे, साठा नोंदवही नसणे, भावफलक न लावणे यामुळे पथकाने कारवाई केली. भरारी पथकात उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, तंत्र अधिकारी विजय गवळी, कृषी सहायक गणेश पाटील सहभागी होते.

नीलकंठ ॲग्रो एजन्सी पांगरी, शीतल ॲग्रो एजन्सी वैराग, गुरुश्रेया ॲग्रो एजन्सी बार्शी, श्री गणपती कृषी सेवा केंद्र शिराळे, स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र चारे या कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. खते, बियाणे व कीटकनाशके परवाना मुदत संपूनदेखील नूतनीकरण केले नसल्यामुळे वैराग येथील महालक्ष्मी ॲग्रो एजन्सी या कृषी सेवा केंद्राला सील केले. विराज ॲग्रो एजन्सी वैराग व महाराष्ट्र कृषी केंद्र बार्शी यांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

Farmer Registration : रेशीम शेतीसाठी पाचशे शेतकऱ्यांची नोंदणी

Ravikant Tupkar : 'काय कारवाई करायची ती खुशाल करा!'; तुपकरांचे थेट राजू शेट्टींना आव्हान

SCROLL FOR NEXT