Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीक विमा थकविणाऱ्या कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांचा दे धक्का!; खातेच गोठवले

Pradhan Mantri Crop Insurance Scheme : खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील नुकसानभरपाईची दिलेली नसल्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Chhatrapati Sambhajinagar News : धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगामाची (२०२२) नुकसानभरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील २९४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी भारतीय कृषी महाकंपनीला चांगलेच फैलावर घेतले आहे. तसेच २९४ कोटी रुपयांचा पीकविम्याची भरण्याचे आदेश देत मुंबई येथील अ‍ॅक्सिस बँकेतील दोन खाती गोठविले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेला तसा आदेश देखील दिला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसानभरपाई दिली जाते. मात्र येथे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील २९४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी भारतीय कृषी महाकंपनीशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. तसेच २९४ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे सांगितले होते. मात्र कंपनकडून यावर कोणतेच उत्तर आले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेतील दोन खाती गोठवली आहेत.

खरीप हंगामातील २९४ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम विमा कंपनीच्या खात्यात होती. ती जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर वळती करण्याच्या सुचना राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने केल्या होत्या.

मात्र सतत यावर पत्रव्यवहार करूनही भारतीय कृषी महाकंपनीने गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर रितसर महाकंपनीला कारणे दाखवा नोटीस तीन वेळा बजावण्यात आल्या होत्या. त्यावर कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी माहिती देताना, भारतीय कृषी विमा कंपनीबाबत माहिती मागविण्यात आली आहे. त्याचे कार्यालय हे मुंबईमध्ये असून नुकसानभरपाईची रक्कम २९४ कोटी रुपयांची आहे. जी जास्त आहे. तर कंपनीच्या खात्यात फक्त सव्वाचार लाख रुपये रक्कम असल्याचे उघड झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT