Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Acquisition of Wells : पारोळा तालुक्यात टंचाई निवारणार्थ विहिरींचे अधिग्रहण

Water Crisis : पारोळा तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, गावपातळीवर पिण्याच्या पाण्याबाबत तालुका प्रशासन ‘अलर्ट’ झाले असून, ६ मार्चपासून खेडीढोक (ता. पारोळा) येथे चार खेपात टँकर सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : पारोळा तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, गावपातळीवर पिण्याच्या पाण्याबाबत तालुका प्रशासन ‘अलर्ट’ झाले असून, ६ मार्चपासून खेडीढोक (ता. पारोळा) येथे चार खेपात टँकर सुरू आहे तर हनुमंतखेडे येथील प्रस्ताव अमळनेर उपविभागाकडे पाठविण्यात आला आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तालुक्यात ११४ गावे आहेत. दरम्यान, उन्हाळ्यातच काही ठरावीक गावांना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासते. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते तर काही वेळा पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता नसते.

तालुक्यातील बऱ्याच गावांना कोणताही पाण्याचा स्रोत नसल्यामुळे उन्हाळा सुरू होताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासू लागते. यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत टंचाईग्रस्त भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढणार नाही, याकडे लक्ष ठेवून असतात आणि त्याच पार्श्‍वभूमीवर प्रशासन हे गाव पातळीवर संबंधित विभागामार्फत टंचाई परिस्थितीचा आढावा घेत उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करतात.

दरम्यान, पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीत पाणीटंचाई बाबत खेडीढोक येथे टँकरने चार खेपा तर हनुमंतखेडे येथील प्रस्ताव मंजुरीबाबत तर पोपटनगर, शेळावे खुर्द व कराडी येथील विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

बोरी प्रकल्पात २५.२० टक्के पाणीसाठा तालुक्याला वरदान ठरलेले बोरी धरण यंदा अपूर्ण पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे या धरणात आजच्या स्थितीत २५.२० टक्के पाणीसाठा आहे. तसेच या धरणातूनच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच पारोळा शहराला देखील याच धरणातून पाणीपुरवठा होत असल्यामुळे तालुकावासियांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता त्याची नासाडी होणार नाही किंवा ते वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT