Solar Energy Project Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Project : मोहोळमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गती

Solar Energy : मोहोळ तालुक्यात ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पा’चे काम युद्धपातळीवर सुरू असून, यंत्रणा सक्षमीकरणाचे काम जोरात सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News : मोहोळ तालुक्यात ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पा’चे काम युद्धपातळीवर सुरू असून, यंत्रणा सक्षमीकरणाचे काम जोरात सुरू आहे. तालुक्यातील जामगाव, चंद्रमौळी औद्योगिक वसाहत व लांबोटी या तीन ठिकाणी ९७ हेक्टर जागा उपलब्ध झाल्याची माहिती या प्रकल्पाचे समन्वयक विकास पुरी यांनी दिली. यामुळे येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

महावितरणच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्री वीज उपलब्ध होते. मात्र रात्री पिकांना पाणी देणे जिवावर बेतणारे आहे. सर्पदंशामुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या अडचणीची मोठी ओरड झाली.

औद्योगीकरणाला दिवसा तर जगाच्या पोशिंद्याला रात्री लाइट या भेदभावाबद्दलही अनेक तक्रारी दाखल आहेत, याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

मोहोळ तालुक्यात कुरणवाडी, पापरी, नरखेड, भांबेवाडी या ठिकाणी ४५ एकर जागा उपलब्ध झाली आहे. सोलर प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यातून तयार होणारी वीज सध्या कार्यरत असणाऱ्या उपकेंद्रात वितरित करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी सध्याचे विद्युत उपकेंद्रात काही यांत्रिक फेरबदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे यंत्रणा सक्षमी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

या प्रकल्पातून ५ हजार मेगॅवॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना त्यांच्या संमतीने शेतात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या पैकी अर्थार्जन ही होणार आहे. शिवाय पूर्णवेळ वीजही मिळणार आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT