E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani News: ई-पीकपाहणीची अट रद्द करा

Crop Registration : शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली. मात्र, त्यानंतरही सरकारने कापूस आणि सोयाबीनला १० हजाराची तुटपुंजी मदत जाहीर केली.

Team Agrowon

Nagpur News : शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली. मात्र, त्यानंतरही सरकारने कापूस आणि सोयाबीनला १० हजाराची तुटपुंजी मदत जाहीर केली.

ती मदत जाहीर करीत असताना ई-पीकपाहणीची अट टाकल्याने ९० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहतील. त्यामुळे ही जाचक अट रद्द करीत शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अशा आशयाचे पत्र राज्याचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.

पत्रात म्हटले, की केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे आणि राज्य सरकारने यासंदर्भात केंद्राकडे धोरणात बदल करण्यासाठी कोणताही पाठपुरावा न केल्याने शेतकऱ्यांच्या मालास बाजारात योग्य मागील दोन वर्षांपासून मिळाला नाही. यामुळे अनेक वेळा या संदर्भात मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. तसेच या संदर्भात अनिल देशमुख यांनी विधानसभेत सुद्धा आवाज उठवला.

तरी परत राज्य सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नव्हते. आता निवडणूक जवळ आल्याने त्यांनी सोयाबीन व कापूस उत्पादकांना दोन हेक्टर पर्यत १० हजार रुपयाची मदत जाहीर केली. बाजारात कापूस व सोयाबीनला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. परंतु १० हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना देवून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकारने केल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.

मोसंबी नुकसानीची मदत द्या

सध्या सततच्या पावसामुळे विदर्भातील मोसंबीची मोठया प्रमाणात गळ होत आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. नेमकी कोणत्या कारणामुळे ही गळ होत आहे हे अजून पुढे आले नाही.

यामुळे राज्य शासनाने तातडीने यांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी तसेच कृषी विभागातील तज्ज्ञांनी यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना उपयोजना सुचवाव्यात अशी मागणी सुद्धा अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहलेल्या पत्रातून केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT