Water Treatment Plant Agrowon
ॲग्रो विशेष

Water Treatment Plant : रायगड जिल्ह्यातील जिते येथे जलप्रक्रिया केंद्र उभारणार

Navi Mumbai Water News : नवी मुंबईतील भविष्यकाळातील पाण्याची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Panveal News : नवी मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील जिते येथे प्रतिदिन २७० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेच्या जलप्रक्रिया केंद्राच्या (व्हीव्हीटीपी) बांधकामाला सिडकोने मंजुरी दिली आहे. ४२ महिन्यांत जलप्रक्रिया केंद्र कार्यान्वित होणार आहे.

नवी मुंबईतील भविष्यकाळातील पाण्याची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. हेटवणे धरणातील पाण्यावर प्रस्तावित २७० एमएलडी क्षमतेने प्रक्रिया केली जाणार आहे.

या पाण्याचे पम्पिंग करून ते सध्या अस्तित्वात असलेल्या विहाल येथील मास्टर बॅलन्सिंग रिझर्व्हॉयरमध्ये (जलाशय) पुढील वितरणासाठी आणले जाणार आहे. या प्रकल्प बांधणीमध्ये २७० एमएलडी क्षमतेच्या जलप्रक्रिया प्लाण्टची रचना, इंजिनीअरिंग, पुरवठा, बांधकाम, स्थापना व हस्तांतर यांचा समावेश होतो.

यात एका स्वच्छ पाण्याच्या पम्पिंग केंद्राचा समावेशही आहे. हा प्रकल्प कामाला आरंभ झाल्यापासून ४२ महिन्यांत पूर्ण होऊन कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाचा देखभाल कालावधी १५ वर्षांचा आहे. यामध्ये अधिक घनतेचा घनकचरा काढून टाकण्यासाठी या प्लान्‍टमध्ये उच्च दर्जाचे क्लॅरिफायर्स वापरले जाणार आहेत.

त्यानंतर रॅपिड ग्रॅव्हिटी सॅण्ड फिल्टर्सद्वारे पाण्यावर प्रक्रिया केली जाऊन क्लोरीनच्या मदतीने पाणी निर्जंतुक केले जाणार आहे. व्हीए टेक डब्ल्यूएबीएजीच्या इंडिया क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश कुमार यांनी या कामाचे कार्यादेश सिडकोने दिल्याचे सांगितले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईतील पाण्याची मागणी पूर्ण करण्यात मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Anand Nadkarni : मनाला दिलासा देणारा आवाज हरपला; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे दुःखद निधन

Social Initiatives: सामाजिक कामांतही हवा कार्यक्षमतेचा, परताव्याचा विचार

Gender Equality: लैंगिक समानतेसाठी धोरणात्मक बदल अपरिहार्य

Non MSP Recommendations: बिगर हमीभाव शिफारशींचे काय ?

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT